सालगडी दाम्पत्यांची आत्महत्या की घातपात ? सेलूच्या वाकी शिवारात आढळले संशयास्पद अवस्थेत मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:02 PM2020-02-13T13:02:21+5:302020-02-13T13:18:22+5:30
सालगडी पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यूने खळबळ
सेलू : वाकी शिवारातील शेतात सालगडी म्हणून आखाड्यावर राहत असलेल्या पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पतीचा विहीरीवरील लोखंडी गजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह तर पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. हा प्रकार आत्महत्याचा आहे की घातपात हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सेलू ते सातोना रस्त्यावरील वाकी शिवारात सेलू येथील हारूण किदवाई यांचे शेत आहे . या शेतातील आखाड्यावर सालगडी तुकाराम माणीक हारके (34, रा कुपटा ता सेलू ) हे पत्नी सविता (29) व मुलासोबत राहत होता. गुरूवारी सकाळी शेत मालक किदवाई हे शेतात आल्यानंतर तुकाराम आणि पत्नी सविता यांचा मृतदेह त्यांना दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर व पोलीस कर्मचारी घटना. घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उतरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.