येलदरी धरण भरले; दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 19:46 IST2020-08-12T19:42:24+5:302020-08-12T19:46:44+5:30
परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा

येलदरी धरण भरले; दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग
येलदरी (जि़. परभणी ) : परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्याने बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास अर्ध्या मिटरने दोन दरवाजे उघडून ४ हजार २१९ क्युसेस वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले़.
परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरले; बुधवारी दुपारी ४ वाजता दोन दरवाजे उघडेल
Posted by Lokmat Aurangabad on Wednesday, 12 August 2020
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण भरले आहे़ त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे़ मंगळवारी धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला होता़ बुधवारी त्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली़ त्यामुळे धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्याने धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या मिटरने दुपारी ४ च्या सुमारास उघडून ४ हजार २१९ क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे़