येलदरी, खडकपूर्णा अन सिद्धेश्वर धरणे तुडूंब; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढल्याने धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:38 PM2022-09-19T18:38:18+5:302022-09-19T18:38:39+5:30

मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

Yeldari, Khadakpurna and Siddheshwar dams are flooded; Danger warning due to increase in discharge in Purna river basin | येलदरी, खडकपूर्णा अन सिद्धेश्वर धरणे तुडूंब; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढल्याने धोक्याचा इशारा

येलदरी, खडकपूर्णा अन सिद्धेश्वर धरणे तुडूंब; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढल्याने धोक्याचा इशारा

googlenewsNext

येलदरी ( परभणी) : पूर्णा नदीवरील तिन्ही धरणे तुडुंब भरली आहे. खडकपूर्णाचे 19, येलदरीचे 10 तर सिद्धेश्वरचे 14 दरवाजे उघडून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मागील दोन दिवसांपासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आज धरणाची सकाळी चार दरवाजे, दुपारी 6 दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र खडकपूर्णा धरणाच्या 19 दरवाज्यातून 44 हजार 408 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून 32 हजार 768 क्यूसेक्स विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडला. विसर्ग वाढल्याने पूर्णा नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी बी के  शिंदे ,खडकपूर्णा प्रकल्पाचे प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ  यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, खडकपूर्णा आणि येलदरी धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सिद्धेश्वर धरणाचा साठा वाढला आहे. सिद्धेश्वरचे सर्व 14 दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला महापूर आला आहे. 
पूर्णा प्रकल्पाचे ही तिन्ही धरणे मागील चार वर्षांपासून तुडुंब भरत आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईच्या समस्या दूर होणार असल्याने  नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Yeldari, Khadakpurna and Siddheshwar dams are flooded; Danger warning due to increase in discharge in Purna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.