कोविड टाळण्यासाठी योग उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:00+5:302021-06-24T04:14:00+5:30

जागतिक योग दिनानिमित्त येलदरकर कॉलनीतील दक्षिण हनुमान मंदिर येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर बोलत होते. जागतिक ...

Yoga useful to avoid covid | कोविड टाळण्यासाठी योग उपयुक्त

कोविड टाळण्यासाठी योग उपयुक्त

googlenewsNext

जागतिक योग दिनानिमित्त येलदरकर कॉलनीतील दक्षिण हनुमान मंदिर येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर बोलत होते. जागतिक योग दिन उत्सव समिती, परभणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महापालिका प्रशासन, नेहरू युवा केंद्र, क्रीडा भारती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जागतिक योग उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषराव जावळे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा संघटक मधुकर जेवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दीपक मुगळीकर म्हणाले, कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी योगाविषयक जनजागृती करणे तसेच सर्वांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचा नियमित सराव सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमात मुक्ताई योग केंद्राच्या वतीने योगावर आधारित आसन नृत्य सादर करण्यात आले. भूमिका गुंडूराव बोराळे हिने त्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी दीपक महेंद्रकर, प्रा. रामविलास लड्डा, कृष्णा कवडी, प्रशांत जोशी, आशिष लोया, कांतिलाल झांबड, सुहास सातोनकर, डॉ. रवी भंडारी, भास्करराव ब्राम्हनाथकर, नरेंद्र कदम, श्रीपाद कुलकर्णी आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Yoga useful to avoid covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.