युवकांनी नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:55+5:302021-03-17T04:17:55+5:30

पूर्णा- शहरी भागात उभारलेल्या उद्योग धंद्यातून रोजगार निर्मिती होते. नवोदित तरुणांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य व समस्यांचे ...

Young people should give priority to new industries | युवकांनी नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

युवकांनी नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

Next

पूर्णा- शहरी भागात उभारलेल्या उद्योग धंद्यातून रोजगार निर्मिती होते. नवोदित तरुणांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य व समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार समीर दुधगावकर यांनी केला. पूर्णा शहरात १५ मार्च रोजी उद्योजकता या अंतर्गत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी समीर दुधगावकर बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे लक्ष्मीकांत कदम, दिनेश चौधरी, हनुमान अग्रवाल, डॉक्टर अजय ठाकूर, राजू धूत, रमेश सुरेश कदम यांची उपस्थिती होती. यावेळी नव उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकांतून तत्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँक संदर्भातील काही अडचणी, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी तरुणांनी उद्योगांकडे बघावे असेही दुधगावकर म्हणाले . रविदास रोहिदास जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन कापसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Young people should give priority to new industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.