आपल्या वाहनावर दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:33+5:302021-09-27T04:19:33+5:30
आठ दिवस राबविली मोहीम शहर वाहतूक शाखेने शहरात ई-चलनद्वारे दंड न भरलेल्या वाहनधारकांविरुध्द नुकतीच मोहीम राबविली. यात ३६४ वाहनधारकांनी ...
आठ दिवस राबविली मोहीम
शहर वाहतूक शाखेने शहरात ई-चलनद्वारे दंड न भरलेल्या वाहनधारकांविरुध्द नुकतीच मोहीम राबविली. यात ३६४ वाहनधारकांनी दंडाच्या रकमेचा भरणा केलेला नव्हता. अशा वेळी त्यांना दंड भरण्यास काही कालावधी देण्यात आला. यानंतर ज्यांनी दंड भरला नाही, अशांनी लोकअदालतीत उपस्थित राहून तडजोड करण्याचे आदेश दिले होते.
अनेकांकडे दंड बाकी
शहरात अनेक वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनावरील लागलेला दंड भरलेला नाही. ही रक्कम किती आणि एकूण किती वाहनधारकांनी नियम मोडला याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
वाहनावर दंड आहे का, या अॅपवर शोधा
आपल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनावर किती दंड लागला आहे, याची माहिती पाहण्यासाठी महाट्राफिक अॅप कार्यरत आहे. यावर वाहनाचा नंबर आणि चेसीस नंबर किंवा इंजिन नंबर टाकल्यावर किती दंड लागला आहे ते कळू शकते.
पोलीस अधिकाऱ्याचा कोट
शहरात दररोज वाहतूक पोलिसांचे पथक कार्यरत राहून वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ज्यांना मोबाईलवर चलन फाडल्याचे एसएमएस येत नाहीत, त्यांनी शहरातील कुठल्याही वाहतूक पोलिसांशी संपर्क करुन आपल्या वाहनावर लागलेला दंड किती आहे, याची तपासणी करता येते. - सचिन इंगेवाड, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी.