मिरवणुकीत नाचताना तरुण छातीत दुखावल्याने कोसळला, उपचारादरम्यान मृत्यू
By मारोती जुंबडे | Updated: April 15, 2024 15:30 IST2024-04-15T15:29:37+5:302024-04-15T15:30:11+5:30
परभणी शहरातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद

मिरवणुकीत नाचताना तरुण छातीत दुखावल्याने कोसळला, उपचारादरम्यान मृत्यू
परभणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचत असताना अचानक छातीत दुखल्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
ईश्वर अशोक कोंपलवार (२७, रा. रमाबाई आंबेडकर नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ईश्वर कोंपलवार हा देखील नाचत होता. मिरवणूक जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आल्यानंतर अचानक त्याच्या छातीत त्रास होत असल्याने त्यास उपचारासाठी परभणीतील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र त्याचा यादरम्यान मृत्यू झाला.
हृदयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात असून याप्रकरणी मयताचे भाऊ चंद्रकांत कोंपलवार यांच्या माहितीवरून नानलपेठ पोलिसात अकस्माक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक ए.एस. चव्हाण, मुरकुटे करत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे.