शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: 'गिरणगाव'च्या आठवणींत रमला बाप्पा! मुंबईच्या अवलियानं साकारली अनोखी सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 3:23 PM

1 / 10
मुंबईत परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा गणपतीसाठी अनोखा देखावा साकारला आहे. मुंबईत एकेकाळी कापड गिरण्यांच्या उंचच उंच चिमण्या आणि गिरण्यांच्या भोंग्यांचा आवाज ऐकू यायचा. याच आठवणी देखाव्याच्या माध्यमातून जाग्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
2 / 10
देखाव्यातून जुनं लालबाग-परळ अर्थात गिरणगाव साकारलं आहे. पराग सावंत दरवर्षी बाप्पाच्या देखाव्यातून नवनवे विषय सादर करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी मुंबईतील बीडीडी चाळीचा देखावा साकारला होता. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
3 / 10
यंदा गिरणगाव साकारुन जुन्हा आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. परळ-लालबागची ओळख असलेली युनायटेड मिल, भारतमाता टॉकीज यात पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
4 / 10
गिरणी कामगारांची एकजूट आणि शाहिरी जागर याचा आठवणीही देखाव्यातून सादर करण्यात आल्या आहेत. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
5 / 10
मुंबईत कापड गिरण्या सुरू झाल्या आणि कामासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं मुंबापुरीत वास्तव्याला आली. यातूनच पुढे गणेशोत्सवाचं एक वेगळं रुप गिरणगावला प्राप्त झालं. त्यामुळे आजही लालबाग-परळमधील गणेशोत्सव त्याच उत्साहात साजरा केला जातो. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
6 / 10
देखाव्यात युनायटेड मिल, भारत माता टॉकीजचं अगदी हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
7 / 10
देखाव्यासोबतच बाप्पाचं मनमोहक रुप देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ( फोटो सौजन्य: पराग सावंत)
8 / 10
पराग सावंत यांनी गेल्या वर्षी मुंबईतील चाळ संस्कृतीचं दर्शन घडवणारा अनोखा आणि तितकाच आकर्षक देखावा साकारला होता.
9 / 10
मुंबईतील चाळ संस्कृतीतील बारकावे हेरुन लक्षवेधी सजावट साकारण्यात आली होती. या देखाव्याचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती.
10 / 10
चाळीतील खेळीमेळीचं वातावरण, चाळीतील सण, पताक्यांची सजावट आणि इतर अनेक बारकावे अतिशय कल्पकतेनं मांडण्यात आले होते.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबई