शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2018 : ही आहेत भारतातील देवीची सर्वात प्राचीन मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 15:16 IST

1 / 6
शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. शक्तीचा सण असलेल्या नवरात्रीमध्ये आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या निमित्ताने पाहूया भारतातील सर्वात प्राचीन अशी देवीची पाच मंदिरे.
2 / 6
करणी माता मंदिर, बीकानेर (राजस्थान) - बीकानेर येथील करणी माता मंदिर येथील उंदरांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात सर्वत्र उंदरांचा संचार दिसून येतो. हे वैशिष्ट्य पाहण्यासाठी येथे देशविदेशातून भाविक येतात.
3 / 6
वैष्णौदेवी, जम्मू काश्मीर - जम्मू येथे असलेले वैष्णौदेवी मंदिर जगप्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणूनही लौकिक असल्याने येथे भाविकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी असते.
4 / 6
दक्षिणेश्वर मंदिर, कोलकाता (पश्चिम बंगाल) - कोलकाता येथील दक्षिणेश्वर मंदिराची गणना देशातील 51 शक्तीपीठांध्ये होते. या ठिकाणी माता सतीच्या उजव्या पायाची चार बोटे पडली होती, असे मानले जाते.
5 / 6
दंतेश्वरी मंदिर, जगदलपूर - जगदलपूर येथील माता दंतेश्वरी मंदिराचाही 51 शक्तीपीठांमध्ये समावेश होतो. या ठिकाणी माता सतीचे दात पडले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम लाकडाने केलेले आहे.
6 / 6
कामाख्या मंदिर, गुवाहाटी (आसाम) - पूर्वोत्तर भारतात वसलेले कामाख्या मंदिर भारतातील जागृत शक्तीस्थानांपैकी एक मानले जाते. भगवान विष्णुंनी माता सतीच्या मृतदेहाचे तुकडे केले तेव्हा माता सतीची योनी या ठिकाणी पडली होती. तेव्हापासून येथे योनीच्या आकाराच्या कुंडाची पूजा होते.
टॅग्स :Navratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक