10 thousand bicycles distributed in Rohit Pawar's constituency by ajit pawar
रोहित पवारांच्या मतदारसंघात वाटल्या तब्बल १० हजार सायकली By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:12 PM1 / 10राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. 2 / 10मतदारसंघातील विविध विषय घेऊन ते सातत्याने मंत्रालयात किंवा संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या कार्यालयातही भेटी-गाठी घेताना दिसून येतात. तसेच, मतदारसंघातही त्यांचा वावर असतो. 3 / 10आता, मतदारसंघातील शाळकरी मुलांसाठी रोहित पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबवलाय. तो म्हणजे शाळेतील मुलांना घर ते शाळा जाण्यासाठी तब्बल १० हजार सायकलींचे वाटप केलंय. 4 / 10 आपल्या राज्याचं आणि देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून कायमच समाधान मिळतं. 5 / 10काल रविवारी झालेल्या सायकल वितरण सोहळ्यात याच विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस भावना व्यक्त करून शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले, असे रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. 6 / 10रोहित पवार यांच्या मतदारसंघातील तरुणांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमवेत बाईक रॅली काढून स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 7 / 10त्यानुसार, अजित पवार यांच्या नेतृत्त्वात बाईक रॅली काढण्यात आली. त्यामध्ये, रोहित पवार हेही सहभागी झाले, उत्साहाने आणि जल्लोषात दादांचं माझ्या मतदारसंघात स्वागत केलं, असं रोहित पवार यांनी म्हटलं. 8 / 10 कर्जत-जामखेड मतदारसंघातील ५वी ते १०वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा. या उद्देशाने मतदारसंघात तब्बल १० हजार सायकली वाटण्यात आल्या. 9 / 10बारामती ऍग्रो आणि KJIDF च्या माध्यमातून शालेय सायकल बँक करण्यात आली असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते १०,००० सायकलचे वितरण करण्यात आले. 10 / 10या माध्यमातून १०००० शालेय विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. सुरुवातीला ३ किमी पेक्षा अधिक अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकल देण्यात येत असून येत्या काळात आणखी सायकल देण्यात येतील, असेही रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications