शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'स्मार्ट टेक गुरुजी गोपाळवाडी', ZP तील पोरांना रशिया दर्शन घडवणारे 'हायटेक शिक्षक'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 12:08 PM

1 / 33
गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी, आनंददायी कृतिशील शिक्षण : राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे
2 / 33
केंद्र सरकारने 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील एकमेव शिक्षकाला हा सन्मान मिळाला आहे.
3 / 33
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलारम यांना हा बहुमान देण्यात आला आहे.
4 / 33
केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यांच्या शिफारसीनुसार 153 शिक्षकांची निवड केली होती. त्यापैकी, 47 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
5 / 33
त्यामध्ये, महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकाचा समावेश आहे. देशात लॉकडाऊन असल्याने ही निवड पद्धती व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.
6 / 33
मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापडीपेक्षा कृती करून दाखवली.
7 / 33
त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा.
8 / 33
त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
9 / 33
मराठी, इतिहास, इंग्रजी या तीन विषयांची पदव्युत्तर पदवी घेतलेले शिक्षक मंगलारम सध्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत तिसरी, चौथीचे वर्गशिक्षक आहेत.
10 / 33
मूळचे अहमदनगर येथील असलेले मंगलारम यांनी डी. एड. केल्यानंतर २००३पासून शिक्षकी पेशाला सुरूवात केली. प्रारंभीची १४ वर्षे त्यांनी पैठण तालुक्यात विविध शाळांवर सेवा दिली. २०१७ मध्ये आंतरजिल्हा बदलीने ते राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेत आले.
11 / 33
शिक्षकी पेशाच्या सुरूवातीपासून मंगलारम यांनी हसतखेळत आनंददायी शिक्षण देण्यावर दिला. मुलांना पुस्तकातून शिकवण्यापेक्षा कृतीतून, दृकश्राव्य पद्धतीने शिकवले तर विद्यार्थी ते कैक पटीने ग्रहण करतात, हे मानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण हीच पद्धत वापरतो, असे ते सांगतात.
12 / 33
त्यांना कलेची आवड असल्याने नाटक, एकांकिका, गायन, खेळ, कविता वाचून ते मुलांना जिंकून घेतात. त्यांच्या इतिहासाच्या तासाची तर विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहतात.
13 / 33
कारण इतिहास शिकवताना ते प्रत्येक विद्यार्थ्याला एकेका पात्रात बसवून त्यांच्याकडून संवाद बोलून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा अभ्यासासह अभिनयाचाही एक तास होतो. नेमके हेच मुलांना भावते.
14 / 33
लोकशाहीतील निवडणूक पद्धत विद्यार्थ्यांना अनुभवता यावी म्हणून ते वर्गातच दोन गटात निवडणूक घेतात. मग दोन गट, त्यांचे चिन्ह, प्रचार, प्रत्यक्ष बटन दाबून मतदान, नंतर मतमोजणी व निकाल. हीच त्यांची अध्ययनपद्धती आहे.
15 / 33
मुलांच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्या कौशल्याला ते नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाची जोड देतात. आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी खेड्यापाड्यातील या मुलांना शाळेत बसून जगाची सफर घडवली आहे.
16 / 33

17 / 33
स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली.
18 / 33
स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली.
19 / 33
स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली.
20 / 33
स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली.
21 / 33
स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली.
22 / 33
दक्षिण कोरियामधील शाळेने गोपाळवाडीच्या मुलांसाठी कल्चरल बॉक्स पाठवला आहे. ग्लोबल नगरीच्या माध्यमातून मुलांनी महाराष्ट्रातील परंतु सध्या जगभर कामानिमित्त असणाऱ्या आपल्या भूमिपूत्रांशी गप्पा मारल्या.
23 / 33
दक्षिण कोरियामधील शाळेने गोपाळवाडीच्या मुलांसाठी कल्चरल बॉक्स पाठवला आहे. ग्लोबल नगरीच्या माध्यमातून मुलांनी महाराष्ट्रातील परंतु सध्या जगभर कामानिमित्त असणाऱ्या आपल्या भूमिपूत्रांशी गप्पा मारल्या.
24 / 33
यातून विद्यार्थ्यांना संवादकौशल्य, इंग्रजी भाषेवरून प्रभुत्व, तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धतीची ओळख झाली.
25 / 33
याशिवाय शिक्षक मंगलारम यांनी शाळेत समाजसहभागातून रंगरंगोटी, डिजिटलायझेशन, वृक्षारोपण, वाचन कट्टा, विद्यार्थी बचत बँक, बाल आनंद मेळावा, खाद्य जत्रा, जयंती, पुण्यतिथी, वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवले.
26 / 33
- एनसीईआरटीच्या ( दिल्ली) कला विभागात मास्टर ट्रेनर म्हणून निवड.
27 / 33
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा २०१६ चा जिल्हा गुरूगौरव पुरस्कार, तर अमन सोशल असोसिएशन ,राहुरीचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१९) प्राप्त झाला आहे.
28 / 33
तसेच यंदा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारवर त्यांनी मोहोर उमटवली असून येत्या शिक्षकदिनी दिल्लीत राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान होणार आहे.
29 / 33
- कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात (एटीएम) महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक .
30 / 33
- महाराष्ट्रच्या चार राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सह•ााग - नियमित रक्तदाता , गेल्या २० वर्षात ७० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले.
31 / 33
- निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव.
32 / 33
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ( बाल•ाारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.
33 / 33
- शाळेतील विविध उपक्रमाचे ‘स्मार्ट टेक गुरूजी गोपाळवाडी’ या नावाचे यू ट्यूब चॅनेल.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाrussiaरशियाEducation Sectorशिक्षण क्षेत्र