'Har Har Mahadev'! Kavadhari welcome in Akola with joy!
'हर हर महादेव'! कावडधारींचे अकोल्यात जल्लोषात स्वागत! By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:57 PM1 / 13अकोला - ग्रामदैवत श्री राज राजेश्वरास जलाभिषेक करण्यासाठी हरिहरेश्वर येथून पूर्णा नदीतील पवित्र जल घेऊन लाखो कावडधारक अकोला शहरात दाखल झाले. मिरवणुकीने ढोल ताशाच्या गजरात 'हर बोला महादेव'चा गजर करीत ते मंदिराकडे मार्गस्थ झाली. 2 / 13अकोट फाईल, गांधी चौक, छत्रपती शिवाजी पार्क टिळक रोड कोथळी बाजार सिटी कोतवाली चौक आदी चौकात ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून मोठ-मोठ्या व्यासपीठावरून कावड धारकांचे स्वागत केले.3 / 13पालखी मार्गावर विविध संस्थांनी शिव शंकरांच्या प्रतिमांसह विविध दैवतांचे मूर्ती उभारून देखावे साकारले. तसेच, स्थानिक कलावंतांद्वारे शिवमहिमा, भजने गात कावड धारकांचा उत्साह वाढविला गेला.4 / 13मिरवणुकीत भोले शंकराच्या व रामभक्त हनुमान तसेच छत्रपती शिवरायांच्या मूर्तींसह नुकत्याच यशस्वी झालेल्या चंद्रयान 3 मोहिमेच्या प्रतिमेचाही समावेश दिसून आला.5 / 13गांधीग्राम ते अकोला या 18 किमीच्या मार्गावर कावडधारी अनवाणी पायाने खांद्यावर कावड घेऊन चालत आले. यामध्ये लहान मुले व महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. 6 / 13सार्वजनिक मंडळांसोबतच लहान लहान चिमुकलेही पालख्या खांद्यावर घेऊन कावड यात्रेत सहभागी झाले. विविध सामाजिक संस्थांनी मिरवणूक मार्गावर स्टॉल उभारून कावडधारकांसाठी पाणी, चहा, महाप्रसादची व्यवस्था केली. 7 / 13संपूर्ण मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून सुमारे 2000 पोलीस कर्मचारी तैनात आले. या सोबतच जिल्ह्यातील होमगार्डची फौजही तैनात होते. तसेच संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जात होती.8 / 13लहान मंडळे व व्यक्तिगत कावडधारक सकाळपासूनच श्री राज राजेश्वर मंदिरावर पोहोचून जलाभिषेक केला. यावेळी मंदिराचा परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला. 9 / 13सर्व भाविकांना जलाभिषेक करता यावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. तसेच, रस्त्यांवर महिला भगिनींतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.10 / 13सर्व भाविकांना जलाभिषेक करता यावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. तसेच, रस्त्यांवर महिला भगिनींतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.11 / 13सर्व भाविकांना जलाभिषेक करता यावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. तसेच, रस्त्यांवर महिला भगिनींतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.12 / 13सर्व भाविकांना जलाभिषेक करता यावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. तसेच, रस्त्यांवर महिला भगिनींतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.13 / 13सर्व भाविकांना जलाभिषेक करता यावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. तसेच, रस्त्यांवर महिला भगिनींतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications