lunar eclipse from Akola city
अकोला शहरातून असे दिसले चंद्र ग्रहण! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 9:44 PM1 / 5बुधवार, ३१ जानेवारी रोजी अकोलेकरांना अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळाला. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर आल्यामुळे तो नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा, तर ३0 टक्कय़ांहून अधिक तेजस्वी दिसला. ३१ मार्च १८६६ नंतर, म्हणजेच तब्बल १५२ वर्षानंतर प्रथमच असा योग जुळून आल्यामुळे अकोलेकरांनी त्याचे तेज उघड्या डोळय़ांनी न्याहाळले. 2 / 5ब्लड मून म्हणजे काय? सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो.3 / 5ब्लुमून म्हणजे काय? सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.4 / 5सुपरमून म्हणजे काय? चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.5 / 5बुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्राच्या ग्रहणकालातील कला टिपल्या आहेत लोकमत अकोला आवृत्तीचे छायाचित्रकार प्रविण ठाकरे यांनी. आणखी वाचा Subscribe to Notifications