Not even wearing earplugs, Bachchu Kadu came in front of the camera along with the activist
'कानशिलात लगावलीच नाही', कार्यकर्त्यासह बच्चू कडू कॅमेऱ्यासमोर आले By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 6:34 PM1 / 9 आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी आता चक्क कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदारबच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यातच, शिंदे गटात गेल्यापासून सोशल मीडियावरही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असते. 2 / 9आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या कडू यांना नुकतेच एका सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. आता, पुन्हा एकदा कडूंनी हात उगारल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच कार्यकर्त्यासह बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत कानशिलात लगावली नसल्याचा खुलासा केला आहे. 3 / 9कडू यांच्या मतदारसंघात सध्या विकासकामाचां धडाका सुरू आहे. तब्बल २०० कोटींच्या विकासकामांची योजनाच त्यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार, मतदारसंघातील गावागावात रस्ते आणि इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत. 4 / 9याच रस्ते कामासंदर्भातील दौरा करत असताना एका गावात कार्यकर्ता चांगलाच नडल्याचं दिसून आलं.अनेकांनी या कार्यकर्त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आपल्या मतावर ठाम राहून जिद्दीला पेटल्याचं दिसून आलं. याचदरम्यान, राग अनावर झाल्याने आमदार कडू यांनी या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. 5 / 9अमरावती जिल्हातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. याचदरम्यान रस्त्याच्या कामकाजा संदर्भात त्यांचा वादविवाद झाला. त्यावेळी, राग अनावर झाल्याने त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशीलात लगावली, 6 / 9त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत, यावेळी कार्यकर्ता व बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर, त्यांनी एकत्र येत खुलासाही केला आहे. 7 / 9अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील गनोजा बाग येथे एका विकास कामाच्या पाहणीदरम्यान बच्चू कडू व एका कार्यकर्त्यांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, बच्चू कडू व सौरभ इंगोले नावाचा कार्यकर्ता अमरावती येथे दोघेही माध्यमांसमोर आले व त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. 8 / 9मला कुठलीही मारहाण झाली नाही कानशिलात लगावली नाही, केवळ थांब रे म्हटलं होतं. दुसऱ्याला खोटी प्रसिद्ध हवी होती म्हणून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केला असा दावा व्हिडिओत दिसत असलेला कार्यकर्ता सौरभ इंगोले यांनी केला आहे. 9 / 9तर, बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, सदर व्हिडिओचा विपार्यास केला गेला होता, मी मारहाण केली नाही. आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक नातं आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांनी दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications