शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Auto Expo 2023 : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी आली १.४९ लाखांची हंगेरीयन बाईक, लूकही जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 9:43 AM

1 / 6
रॉयल एनफिल्ड बाईकचा 350 सीसी सेगमेंटमध्ये आजही दबदबा कायम आहे. या कंपनीच्या बहुतांश बाईक या सेगमेंटमध्ये विकल्या जातात. सध्या भारतात निओ-क्लासिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत आहे.
2 / 6
अशा परिस्थितीत हंगेरियन दुचाकी कंपनी Keeway ने बुधवारी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली बाईक Keeway SR250 लाँच केली. ही बाईक 1.49 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली. या बाईकची थेट स्पर्धा रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाईकशी असेल.
3 / 6
कीवे SR250 मध्ये कंपनीच्या SR125 मोटरसायकलप्रमाणेच क्लासिक रेट्रो-थीम आहे. कंपनीची SR250 बाइक भारतात आधीपासून उपलब्ध आहे. यामध्ये जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आहेत.
4 / 6
125 सीसी बाईक प्रमाणे, SR250 ला मल्टी-स्पोक व्हील्स, ब्लॉक पॅटर्न टायर्स, चॉप्ड फेंडर्स, फ्रंट फोर्क गेटर्स, वर्तुळाकार इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रिबड पॅटर्न सीट यासारख्या डिझाइन घटकांसह जुना स्कूल स्क्रॅम्बलर-प्रकारचा स्टॅन्स मिळतो. मोटरसायकलच्या वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये एक गोल सिंगल-पॉड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि एलईडी लाइटिंग पॅकेज समाविष्ट आहे.
5 / 6
कीवे SR250 मध्ये 250 cc सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक इंजिन 7500rpm वर 16.08HP ची पीक पॉवर आणि 6500rpm वर 16Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे लो आणि मीडियम रेंजमध्ये चांगला टॉर्क जनरेट करते. ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी रेड आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन रंगांमध्ये बाईक खरेदीसाठी उपलब्ध आहे.
6 / 6
एप्रिल 2023 पासून टेस्ट राईडसह डिलिव्हरीही सुरू केली जाईल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे. कीवे SR250 रॉयल एनफील्ड हंटर 350, TVS Ronin आणि Kawasaki W175 ला भारतीय बाजारपेठेत टक्कर देईल. नवीन SR250 मॉडेल या ऑटो कंपनीच्या सध्याच्या लाईनअपमध्ये सामिल करण्यात आलेय. कंपनीचे सात प्रोडक्ट्स यापूर्वीच विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023Automobileवाहन