शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

200Km रेंज अन् किंमतही कमी; OLA ला टक्कर देण्यासाटी लॉन्च मेड इन इंडिया EV स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 2:07 PM

1 / 6
Enigma Ambier N8: भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकीकडे आघाडीच्या टू-व्हिलर कंपन्या एकापेक्षा एक मॉडेल्स बाजारात लॉन्च करत आहे, तर दुसरीकडे नव्या स्टार्ट कंपन्याही यात हात आजमावत आहेत. यातच आता मध्य प्रदेशातील कंपनी Enigma Automobiles ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'Ambier N8' बाजारात आणली आहे.
2 / 6
ही एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असून, याची किंमत 1.05 लाख पासून सुरू होते आणि रु. 1.10 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. किंमत आणि रेंजच्या बाबतीत ही स्कूटर बाजारात OLA आणि Ather शी स्पर्धा करेल.
3 / 6
Ambier N8 मध्ये कंपनीने 1500-वॅटची BLDC इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. या मोटरचा टॉप स्पीड 40 ते 50 किलोमीटर प्रति तास आहे. स्कूटरला 63V 60AH बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर एका चार्जवर 200 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात.
4 / 6
आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटरचे एकूण वजन 220 kg असून, 200 kg पर्यंत लोड वाहून नेण्यास सक्षम आहे. यात 26 लीटर बूट स्पेस मिळतो. स्कूटरचा व्हीलबेस 1290 मिमी आहे. या स्कूटरला रुंद फूट बोर्ड मिळतो, ज्यामुळे ड्रायव्हरला पाय ठेवण्यासाठी चांगली जागा मिळते. याशिवाय यात एक रुंद सीट आणि पिलियन रायडरसाठी बॅकरेस्ट आहे.
5 / 6
या स्कूटरमध्ये 130 मिमी फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन देण्यात आले आहे, तर मागील बाजूस स्प्रिंग सस्पेंशन मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्ही कंपनीच्या Enigma On Connect अॅपचा वापर करू शकता. यात सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, अँटी थेफ्ट अलार्म, कीलेस एंट्री, फाइंड माय स्कूटर, यूएसबी पोर्ट, मोटर वॉकिंग असिस्ट, रिव्हर्स मोड, जिओ फेन्सिंग आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
6 / 6
Ambier N8 एकूण पार रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात ग्रे, व्हाइट, ब्लू, मॅट ब्लॅक आणि सिल्व्हर कलरचा पर्याय आहे. ग्राहक या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे बूक करू शकता. या स्कूटरच्या बॅटरीवर कंपनी 3 वर्षांची वॉरेंटी देत आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडbikeबाईकAutomobileवाहन