2021 force gurkha suv unveiled rival of mahindra thar check launch delivery date and price details
नव्या रूपात सादर झाली पॉवरफुल SUV Force Gurkha; परफॉर्मन्सनं देणार Thar ला टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:00 PM1 / 8ऑफरोडिंगच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सनं आपल्या प्रसिद्ध एसयूव्ही Force Gurkha च्या नेक्स्ट जनरेशनवरुन पडदा उठवला आहे. यामध्ये अपडेटेड डाझाईनसोबत नव्या तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे.2 / 8लाँच झाल्यानंतर ही एसयुव्ही प्रामुख्यानं Mahindra Thar या एसयूव्हीला टक्कर देणार आहे. दरम्यान, दिवाळीमध्ये सणाच्या पार्श्वभूमीवर ही गाडी लाँच केली जाऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. 3 / 82021 मध्ये ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा ही कार प्रदर्शित करण्यात आली होता. Gurkha 4X4 अर्थातच ऑफ-रोडर आहे आणि ही कार या सेगमेंटमध्ये महिंद्रा थारशी स्पर्धा करणार आहे. 4 / 8नव्या Gurkha ऑफ-रोडिंग क्षमता वाढवण्यासाठी सेंट्रल कन्सोलमध्ये 4x4 हाय आणि 4x4 लो लीवर सोबत येते. दरम्यान, दोन्ही एक्सलवर मेकॅनिकली डिफरेन्शिअल लॉक असलेली ही एकमेव एसयुव्ही असल्याचा दावाहीही कंपनीनं केला आहे. दरम्यान, ही एसयुव्ही गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. 5 / 8या एसयुव्हीमध्ये 2,400mm चा व्हिलबेस देण्यात आला आहे. जो एयुव्हीच्या आत चांगली केबिन स्पेस देण्यास मदत करतो. याच्या फ्रन्ट आणि रिअरमध्ये ब्लॅक-क्लॅडेड बंपरसोबत मोठे फ्लेयर्ड व्हिल आर्क देण्यात आले आहेत. यामध्ये 16 इंचाचे स्टील व्हिल्स, ब्लॅक आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर (ORVM's) आणि स्नोर्कल, ब्लॅक आऊट रूफ रेलदेखील देण्यात आला आहे. 6 / 8कंपनीनं या एसयुव्हीमध्ये 2.6 लीटर क्षमतेचं डिझेल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 91PS ची पॉवर आणि 250Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि फोर व्हिल ड्राईव्ह सिस्टमसोबत येतं. 7 / 8सुरक्षेच्या दृष्टीनं Gurkha मध्ये ड्युअल फ्रन्ट एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, एबीएस, लेन चेंज इंडिकेटर, टायर प्रेशर मॉनेटर सिस्टमसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 8 / 8सध्या या एसयुव्हीच्या किंमतीबाबत काही माहिती देण्यात आली नाही. परंतु ही कार १० ते १२ लाख रूपयांच्या दरम्यान लाँच केली जाऊ शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications