शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१५ टक्के जास्त मायलेज, आकर्षक रंगासह नवीन TVS Star City Plus लॉन्च; पाहा, किंमत व डिटेल्स

By देवेश फडके | Published: March 02, 2021 5:59 PM

1 / 10
गतवर्षात ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचे ढग हळूहळू दूर होताना दिसत आहेत. अनेक कंपन्यांकडून आपल्या वाहनांचे फेसलिफ्ट व्हर्जन, नवीन मॉडेल्स लॉन्च करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून सुरू आहे.
2 / 10
टू-व्हीलरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील एकंदरीत ट्रॅफिकची परिस्थिती पाहता दुचाकीला प्राधान्य मिळत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या TVS ने आपल्या Star City Plus नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. (2021 TVS Star City Plus with disc brake variant launched in India)
3 / 10
TVS ने या स्पेशल एडिनशनच्या बाइकचे टीजर आधीच लॉन्च केले होते. त्यानंतर नवीन बाइक स्टार सिटी प्लसचे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. TVS Star City Plus कंपनीची एक लोकप्रिक बाइक आहे.
4 / 10
गेल्या १५ वर्षापासून TVS Star City Plus ही बाईक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. आतापर्यंत ३० लाखांहून जास्त युनिटची विक्री करण्यात आली आहे.
5 / 10
TVS Star City Plus चे नवीन व्हर्जन रेड ब्लॅक टोन कलर स्कीम मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पॉवरसाठी बीएस६ कम्प्लायंटचे ११० सीसी, सिंगल सिलिंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत ही बाईक १५ टक्के जास्त मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
6 / 10
या नवीन बाइकमध्ये कंपनीकडून ETFi किंवा Eco-Thrust फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजी दिले आहे. तसेच फोर स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. या नवीन बाईकला ट्युबलेस टायर देण्यात आले आहेत.
7 / 10
बीएस ६ मध्ये येणाऱ्या या बाईकचे इंजिन ७३५० आरपीएमवर ८.०८ बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि ४५०० आरपीएमवर ८.७ एनएम चे जनरेट करते. या बाईकला १७ इंचाचे व्हील्स देण्यात आले आहेत.
8 / 10
TVS Star City Plus मध्ये 90 किलोमीटर प्रति तास इतका वेग मिळत आहे. TVS Star City Plus च्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फॉर्क सस्पेंशन दिले आहे. तर याच्या रियरमध्ये ५ स्टेप अडजस्टेबल रियर शॉक्स दिले आहे.
9 / 10
TVS Star City Plus च्या Disc ब्रेक्स व्हेरिअंटची भारतीय बाजारातील किंमत ६८ हजार ४६५ रुपये आहे. तर ड्रम ब्रेक्स व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत ६५ हजार ८६५ रुपये आहे. यात ब्लॅक रेड, ब्लॅक ब्लू, ग्रे ब्लॅक, रेड ब्लॅक, व्हाइट ब्लॅक अशा रंगांचा पर्याय देण्यात आला आहे.
10 / 10
स्टॅंडर्ड मॉडेल ड्रम ब्रेक्सच्या तुलनेत नवीन डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत सुमारे २ हजार ६०० रुपयांनी अधिक असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय बाजारपेठेत TVS कंपनीच्या अनेक बाइक उपलब्ध आहेत. बहुतांश बाइक ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
टॅग्स :bikeबाईकtwo wheelerटू व्हीलर