शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Yamaha नं लाँच केली FI तंत्रज्ञान असलेली Hybrid Scooter; जबरदस्त फीचर्ससह मिळतं उत्तम मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:53 PM

1 / 9
Yamaha Motors India नं आपल्या भारतीय बाजारपेठेत व्हेइकल पोर्टफोलिओला अपडेट करत एक नवी हायब्रिड स्कूटर RayZR लांच केली. आकर्षक लूक आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
2 / 9
यामध्ये RayZR 125 Fi Hybrid आणि स्ट्रीट रॅल हायब्रिट या व्हेरिअंट्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की रे ZR स्कूटर विशेषतः18 ते 40 वयोगटातील तरूण तरूणींचा विचार करुन तयार करण्यात आली आहे.
3 / 9
तर स्ट्रीच रॅली मॉडेल 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी योग्य असेल. कंपनीने स्कूटरला थोडा स्पोर्टी लूक आणि डिझाइन दिले आहे. ही स्कूटर एकूण 7 रंगांसह बाजारात सादर करण्यात आली आहे, त्यापैकी काही रंग नवीन देखील आहेत.
4 / 9
ही दोन्ही मॉडेल्स यामाहाच्या स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) प्रणालीने सुसज्ज आहेत. त्यात दिलेल्या हायब्रिड सिस्टीममुळे स्कूटरचे मायलेज आणखी चांगले होते. कंपनीचे म्हणणे आहे की एसएमजी यंत्रणा चढण असलेल्या रस्त्यांवर जाताना स्टॅगरमुळे होणारी असुरक्षितता कमी करते.
5 / 9
यामाहाने या स्कूटरमध्ये 125 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. जे 8bhp पॉवर आणि 10.3Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचे एकूण वजन 99 किलो आहे.
6 / 9
जेव्हा तुम्ही स्कूटर सुरू करता तेव्हा त्याच्या तीन सेकंदांनंतर जेव्हा थ्रॉटस पुन्हा कट होतो किंवा इंजिन आरपीएम निर्धारित स्तरापेक्षा अधिक होतो, तेव्हा पॉवर अससिस्ट आपणहून कॅन्सल होतो. सोबतच इन्स्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये एक इंडिकेटर लाईट पॉवर असिस्ट (हायब्रिड सिस्टम) चालू झाल्यानंतर रायडरला देखील माहिती दिली जाते.
7 / 9
यामाहाचे ब्लूटूथ-सक्षम मोटारसायकल कनेक्ट-एक्स अॅप RayZR 125 Fi हायब्रिड (डिस्क आवृत्ती) आणि स्ट्रीट रॅली 125 Fi हायब्रिडमध्ये देखील देण्यात आले आहे. जे कॉलबॅक, लोकेट माय व्हेइकल, राइडिंग हिस्ट्री, पार्किंग रेकॉर्ड आणि हॅझर्ड यासह अनेक सोयीस्कर सुविधा देते.
8 / 9
इतर फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, या स्कूटरला साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच, पास स्विच, एलईडी पोझिशन लाइट, पॉवर असिस्टंट इंडिकेटर, सीट ओपनरसह मल्टी-फंक्शन की, वाईड 110 मिमी रिअर टायर आणि 21 लिटर अंडर सीट स्टोरेजही देण्यात आलं आहे.
9 / 9
या स्कूटरची किंमत 76,830 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे. एकूणच, कंपनीने या प्राईज सेगमेंटमध्ये उत्तम स्कूटर लाँच केली आहे.
टॅग्स :yamahaयामहाscooterस्कूटर, मोपेडIndiaभारत