शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट! विना खरेदी घरी आणा नवी कोरी WagonR; पेट्रोल, CNG पर्यायासह दमदार फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 9:40 AM

1 / 9
खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी Maruti Suzuki ची २०२२ WagonR भारतात लॉन्च झाली आहे. फेसलिफ्ट मॉडेलची एक्स शोरुम किंमत ५.३९ लाख रुपयांपासून सुरुवात होते. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ७.१० लाख रुपयांपर्यंत आहे.
2 / 9
कंपनीनं या कारची CNG व्हेरिएंटही लॉन्च केली आहे. ज्याची एक्स शोरुम किंमत ६.८१ लाख रुपये आहे. इतकचं नाही तर केवळ खरेदी करून ही गाडी घरी आणू शकत नाही तर भाड्यानेही ही गाडी तुम्ही घरी आणू शकता. कंपनीनं ही सुविधाही ग्राहकांसाठी दिली आहे.
3 / 9
कंपनीनं New WagonR Facelift वर सबस्क्रिप्शन उपलब्ध केली आहे. ग्राहकांना दर महिना १२ हजार रुपये मासिक भाडे देऊन विना खरेदी ही गाडी घरी आणू शकतात. २०२२ WagonR सह मारुती सुझुकीनं पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय उपलब्ध केले आहेत.
4 / 9
त्यातील पहिलं इंजिन १.० लीटरचं सीरिज डुअल जेट इंजिन आहे. जे ६५.७ बीएचपी ताकदीचं आणि ८९ एनएम पीक टॉर्कपासून बनलं आहे. याचं CNG व्हर्जन ५६ बीएचपी पॉवर आणि ८२ एनएम पीक टॉर्क बनवण्यात आले आहे. दुसऱ्या नंबर १.२ लीटर डुअल वीवीटी इंजिन ८८.५ बीएचपी पॉवर आणि ११३ NM पीक टॉर्कनं बनवलं आहे
5 / 9
कंपनीनं कमी किंमतीत दमदार फिचर्ससह ही कार ग्राहकांसाठी आणली आहे. जी फूल ऑन पैसा वसूल आहे. ग्राहकांना WagonR किती पसंत आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता हॅचबॅक नवीन मॉडेल लॉन्च झाल्यानंतर त्याची विक्री प्रचंड वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
6 / 9
याशिवाय कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सही जोडण्यात आले आहेत. यात स्मार्टफोन नेव्हिगेशनसह ७-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट प्रणाली आहे, जी ४ स्पीकर्ससह येते. HEARTECT प्लॅटफॉर्म असलेली नवीन WagonR तिच्या रायडर्ससाठी उत्तम सुरक्षा उपाय प्रदान करते
7 / 9
यामध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये ग्राहकांसाठी कारमध्ये देण्यात आली आहेत
8 / 9
नवीन WagonR आधीपेक्षा जास्त मायलेज असल्याचा दावा करत आहे. कंपनीने सांगितले की, त्याचे १.०. L इंजिन पेट्रोल व्हर्जनमध्ये २५.१९किमी/ प्रति लीटर मायलेज देईल, जे जुन्या मॉडेलपेक्षा सुमारे १६ टक्के जास्त आहे. दुसरीकडे, S-CNG मध्ये हे मायलेज ३४.०५ KMPL असेल, जे सध्याच्या मॉडेलपेक्षा ५ टक्के जास्त आहे.
9 / 9
आगामी काळात मारुती सुझुकी अपडेटेड Vitara Brezza, Ertiga आणि XL6 सारख्या कार लॉन्च करणार आहे. याशिवाय नवीन अल्टो देखील लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांसाठी मारुती सुझुकी यंदा आकर्षक सुविधाही आणल्या आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी