शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2023 Hyundai Verna: 6 एअरबॅग्स आणि 65 सेफ्टी फीचर्स असलेली नवीन कार लॉन्च, 20Km चे मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 2:49 PM

1 / 8
2023 Hyundai Verna Price and Features: दक्षिण कोरियन कार मेकर कंपनी ह्युंदाईने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आपली प्रसिद्ध सेडान Hyundai Verna चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या या कारमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.
2 / 8
या कारमध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक सनरुफ आणि अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) यासह अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. या फॅमिली सेडान कारची सुरुवातीची किंमत 10,89,900 रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने या नवीन Verna ला स्पोर्टी डिझाइन दिले आहे.
3 / 8
या कारमध्ये अनेक डिझाईन एलिमेंट्स सामील केले आहेत, ज्यामुळे ही मागील मॉडेलपेक्षा जास्त चांगली आणि आकर्षक दिसते. यात स्प्लिट हेडलाइट्ससह संपूर्ण एलईडी लाइट बार देण्यात आला आहे. कंपनीने या सेडानला फ्युचरिस्टिक लुक आणि डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. या सेडानमध्ये फ्लेअर व्हील आर्च देण्यात आला आहेत, ज्यामुळे कारच्या साइड प्रोफाइलला मस्क्यूलर लुक दिसेल.
4 / 8
स्टायलिश डायमंड कट अलॉय व्हील्स कारचा लुक वाढवतात. या सेडान कारचा लूक अतिशय आकर्षक असून तरुणांना ही सेडान खूप आवडेल अशी अपेक्षा आहे. या कारचे इंटीरियर ड्युअल टोन प्रीमियम थीमने सजवण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, कारला ड्रायव्हर केंद्रित केबिन देण्यात आली आहे आणि ती पूर्वीपेक्षा जास्त लेग रूम, हेड रूम देईल.
5 / 8
या कारमध्ये 528 लीटर बूट स्पेस मिळतो, जो या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम आहे. कारमध्ये दिलेली 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग सिस्टीम कारचे इंटीरियर आणखी आकर्षक बनवते. सेडानला फ्री-स्टँडिंग ड्युअल-स्क्रीन सेटअप मिळतो, ज्याला 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.
6 / 8
सेडानला लोअर आणि मिड व्हेरियंटमध्ये ड्युअल-टोन ब्लॅक आणि ऑफ-व्हाइट इंटीरियर थीम मिळते, तर टॉप-एंड ट्रिमला लाल हायलाइट्ससह ऑल-ब्लॅक केबिन मिळेल. कंपनीने नवीन Hyundai Verna दोन इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. यात 1.5l MPi पेट्रोल नॅचरल एस्पिरेटेड इंजिन आहे, जे 115hp पॉवर आणि 143.8 Nm टॉर्क जनरेट करते.
7 / 8
हे 6-स्पीड मॅन्युअल आणि इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (IVT) शी जोडलेले आहे. ही सेडान 18.6 kmpl (MT) आणि 19.6 kmpl (IVT) मायलेज देईल, असा दावा Hyundai ने केला आहे. नवीन Hyundai Verna मध्ये कंपनीने 65 सुरक्षा फीचर्स दिले आहेत. या कारला 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD).
8 / 8
यांसह VSM, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स मिळतात. इतर वैशिष्ट्यांमध्ये स्विच करण्यायोग्य कंट्रोलर, 8-स्पीकर बोस प्रीमियम ऑडिओ सिस्टम, तीन ड्राइव्ह मोड - इको, नॉर्मल आणि स्पोर्ट, हवेशीर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलाइट्स यांचा समावेश आहे.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनcarकार