By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 13:17 IST
1 / 6टाटा मोटर्सने एमजी, व्होल्वो, मर्सिडीज, ह्युंदाई सारख्या भल्याभल्या कंपन्यांना नाही जमले ते नव्या नेक्सॉन ईव्हीमध्ये करून दाखविले आहे. टाटा लवकरच छोटा पॅकेट, बडा धमाका करणार आहे. भारतीय बाजारात ईव्ही बाजारपेठेत किंग बनलेल्या टाटाने गुरुवारी रात्री नेक्सॉन ईव्ही दाखविली आहे. 2 / 6नव्या नेक्सॉन ईव्हीद्वारे तुम्ही पिकनिकला गेला असाल तर तिथे विद्युत उपकरणे वापरू शकणार आहात. याचबरोबर तुम्ही दुसरी ईलेक्ट्रीक कार किंवा अन्य उपकरणे चार्जही करू शकणार आहात. एवढेच नाही तर तुम्ही कारमध्ये इन्फोटन्मेंट सिस्टिमवर हॉट स्टार, प्राईमसारख्या अॅपवर मुव्ही देखील पाहू शकणार आहात. आहेत की नाही भन्नाट गोष्टी...3 / 6टाटाने नेक्सॉन ईव्हीचे रुपडेही पालटले आहे. तसेच ‘.ev’ बॅजिंगही दिले आहे. नवीन टचस्क्रीन सेट-अप आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह कर्व्ह इंटीरियर डिझाइन देण्यात आले आहे. केबिन पूर्णपणे हायटेक करण्याचा प्रयत्न केला आहे. 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. 4 / 6360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आदी फिचर्स आहेतच. सोबत सर्व सीटसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट, आपत्कालीन आणि ब्रेकडाउन कॉल असिस्टंटसह ISOFIX म्हणून 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.5 / 6एन्फोटेन्मेंटसाठी टाटाने Arcade.ev हे अॅप बनविले आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ यासारखे ओटीटी प्लॅटफॉर्म वापरता येणार आहेत. जेबीएल साउंड सिस्टीम, व्हॉईस कमांड, सिंगल-पॅन सनरूफ, फास्ट चार्जिंग सी-पोर्ट देण्यात आला आहे. बॅटरी पॅक नवीन देण्यात आलेले नाहीय, परंतू आधीच्या तुलनेत 30kWh आणि 40.5kWh दोन्ही बॅटरींची रेंज १२ किमीने वाढल्याचा दावा केला आहे. 6 / 6कारसोबत कंपनी 7.2kW क्षमतेचे AC चार्जर देणार आहे. याव्दारे मिड रेंज कार चार्ज होण्यासाठी 4 तास 30 मिनिटे व लाँग रेंज कारसाठी 6 तास लागणार आहेत. DC फास्ट चार्जरवर हा चार्जिंग वेळ सुमारे 56 मिनिटांवर येणार आहे.