शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बजाजने लॉन्च केली ऑल न्यू Bajaj Pulsar N150 अणि Pulsar N160; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:24 PM

1 / 5
2024 Bajaj Pulsar N150 & Pulsar N160 Launch: देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bjaj Auto ने त्यांच्या लोकप्रियत Pulsar चे नवीन N150 आणि N160 व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. 2024 Bajaj Pulsar N150 आता दोन रंगांमध्ये (काळा आणि पांढरा) उपलब्ध असेल. या नवीन बाईकची किंमत 1,17,677 रुपये(एक्स-शोरुम) आहे. तर, 2024 बजाज पल्सर N160 तीन रंगांमध्ये (काळा, निळा आणि लाल) उपलब्ध असेल. या बाईकची किंमत 1,30,560 रुपये (एक्स-शोरुम) आहे.
2 / 5
2024 Bajaj Pulsar N150 आणि Pulsar N160 नवीन डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर देण्यात आले आहे. यावर कॉल, बॅटरी लेव्हल, मोबाईल सिग्नल स्ट्रेंथ आणि मोबाईल नोटिफिकेशन अलर्ट यांसारखी माहिती उपलब्ध असेल. तुम्ही स्विच क्यूबवर दिलेल्या बटणाद्वारे कॉलला उत्तर देऊ शकता किंवा डिस्कनेक्टही करू शकता.
3 / 5
बाईकच्या LCD डिस्प्लेवर तुम्हाला फ्युअल इफिशीयन्सी आणि बाईक किती अंतर चालेल, याची माहिती मिळेल. याशिवाय यात स्पीड, इंजिन रेव्ह, अॅव्हरेज फ्युअल इफिशीयन्सी, गीअर पोझिशन इंडिकेटर आणि इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमी देखील जाणून घेता येईल. एकूण काय तर या नवीन पल्सरवर रायडिंगचा अनुभव अधिक चांगला असेल.
4 / 5
2024 बजाज पल्सर N150 आणि Pulsar N160 मध्ये नवीन रंग आणि बॉडी ग्राफिक्स मिळतात. या व्हिज्युअल अपडेट्सशिवाय, बाईकचे डिझाइन आणि इंजिन फीचर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. नवीन Pulsar N150 मध्ये तेच 149.68cc इंजिन आहे, जे 14.3bhp पॉवर आणि 13.5Nm टॉर्क जनरेट करते आणि हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
5 / 5
दुसरीकडे, नवीन पल्सर N160 मध्ये 164.82cc, DTS-I इंजिन आहे, जे 15.8bhp कमाल पॉवर आणि 14.65Nm पीक टॉर्क जनरेट करते. नवीन पल्सर N160 मध्ये पारंपारिक फ्रंट फोर्क सेटअप आहे. 2024 Bajaj Pulsar N150 आणि Pulsar N160 बाजारात थेट Suzuki Gixxer आणि TVS Apache RTR 160 4V शी स्पर्धा करतील.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobile Industryवाहन उद्योग