34Km Mileage and Price Rs 5.54 Lakh; Maruti's 'WagonR' Car Surpasses All other cars
34Km मायलेज अन् 5.54 लाख रुपये किंमत; Maruti च्या 'या' कारने सगळ्यांना मागे टाकले... By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 7:46 PM1 / 7 भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटच्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, विशेषत: लोक कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या कारला पसंती देत आहेत. पण, आज हॅचबॅक कारची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या एप्रिलमध्ये हॅचबॅक कारने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून, त्यात मारुती सुझुकीच्या गाड्या आघाडीवर आहेत. मारुती सुझुकीचा टॉल बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Maruti WagonR ने पुन्हा एकदा सर्वांना मागे सोडले आहे. त्याच वेळी, दुसरी आणि तिसरी कार देखील मारुती सुझुकीची आहे. चला तर मग एक नजर टाकूया देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सबद्दल.2 / 7 मारुती वॅगन आर: मारुती सुझुकी वॅगनआर त्याच्या विशिष्ट बॉक्सी डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात या कारच्या एकूण 20,879 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने ही कार दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. एका व्हेरियंटमध्ये 1.0-लिटर क्षमतेचे इंजिन आहे तर दुसर्या व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे.3 / 7 हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. ही कार CNG व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 23.56 किमी मायलेज देते तर CNG व्हेरिएंट 34.05 किमी मायलेज देते. या कारची किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये आहे.4 / 7 मारुती स्विफ्ट: मारुती सुझुकीने आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार स्विफ्टच्या एकूण 18,573 युनिट्सची विक्री केली आहे. ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. एकूण चार व्हेरिएंटमध्ये येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट भारतीय ग्राहकांमध्ये बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 90PS चा पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते.5 / 7 ही कार पेट्रोल इंजिन तसेच CNG प्रकारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. साधारणपणे, कारचे पेट्रोल मॉडेल 22 किमी आणि सीएनजी मॉडेल 30 किमी मायलेज देते. त्याची किंमत रु.6.00 लाख ते रु.9.03 लाख आहे.6 / 7 मारुती बलेनो: मारुती बलेनो ही कंपनीने देशांतर्गत बाजारात ऑफर केलेली पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. गेल्या एप्रिल महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण 16,180 युनिट्सची विक्री केली आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 12 व्होल्ट माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 89Bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिनसोबत ही कार CNG प्रकारातही उपलब्ध आहे. याचे पेट्रोल व्हेरियंट 22.35 किमी/लिटरपर्यंत मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट 30.61 किमी/किलोपर्यंत मायलेज देते.7 / 7 अलीकडेच या कारमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यात 6 एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट, सीट- बेल्ट टेन्शनर इत्यादी दिले आहेत. याशिवाय हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिअर डिफॉगर, ऑल पॉवर विंडो, कीलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आदी फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. याची किंमत 6.61 लाख रुपये ते 9.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications