शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 10:34 AM

1 / 7
LML Star Electric Scooter: 90 च्या दशकातील लोकप्रिय कंपनी LML (लोहिया मशिनरी लिमिटेड) पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर Star चे बुकिंग देखील सुरू केले आहे. कंपनी आपली तीन उत्पादने बाजारात आणणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही स्टार ई-स्कूटर बुक करू शकता.
2 / 7
LML च्या मते, स्टारला अॅडजस्टेबल सीटिंग, इंटरएक्टिव्ह स्क्रीन, फोटोसेन्सिटिव्ह हेडलॅम्प मिळेल. याशिवाय, यात 360 डिग्री कॅमेरा, हॅप्टिक फीडबॅक आणि एलईडी लाइटिंग सारखे फीचर्सदेखील मिळतील. LML ची Vespa स्कूटर 90 च्या दशकात खूप लोकप्रिय होती. तथापि, कालांतराने, देशातील LML वाहनांची लोकप्रियता कमी झाली. भारतीय बाजारपेठेत, एलएमएल स्टार ही टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक, एथर, ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही, हिरो इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांच्या अनेक मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते.
3 / 7
कंपनीच्या या इलेक्ट्रीक स्कूटरचं बुकिंग कोणत्याही टोकन अमाऊंटशिवाय करता येणार आहे. तुम्ही पैसे न देता ही स्कूटर बुक करू शकता. एलएमएल स्टार साठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे हे सांगताना आम्हाला आनंद होतोय. एलएमएल स्टार आमच्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वाहनांप्रती वाढणारा स्नेह आणि अपेक्षा पूर्ण करेल. आमचा प्रोडक्च अधिक रेंज, उत्तम स्पीड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे एमडी डॉ. योगेश भाटीया यांनी दिली.
4 / 7
कंपनीच्या मते, स्टार इलेक्ट्रीक स्कूटर उत्तम राइडिंग अनुभव देईल. यात अॅडजस्टेबल सीटिंग, इंटरएक्टिव्ह स्क्रीन, फोटोसेन्सिटिव्ह हेडलॅम्प मिळेल. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, हॅप्टिक फीडबॅक आणि एलईडी लाइटिंग सारखे फीचर्स देखील मिळतील. स्कूटर अतिशय मजबूत डिझाइनसह येईल. या इलेक्ट्रीक स्कूटरच्या पुढील बाजूस ब्लॅक कलर ॲप्रन देण्यात आले आहे.
5 / 7
स्कूटरवर 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील दिसत आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि इतर अनेक फीचर्स मिळणे अपेक्षित आहे. एलएमएल इलेक्ट्रीकने आपल्या इलेक्ट्रीक वाहनाचे तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्यासाठी जर्मन इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी ई-रॉकइट (eROCKIT) सोबत हातमिळवणी केली आहे.
6 / 7
यात सर्व-हवामान सुरक्षिततेसह IP67-रेटड बॅटरी, नियंत्रणासाठी हॅप्टिक फीडबॅक आणि लांबच्या राइड करणाऱ्यांसाठी इनबिल्ट GPS आहे. या इलेक्ट्रिक हायपरबाईकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल. यानंतर कंपनी इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च करेल आणि ऑगस्ट 2023 पासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.
7 / 7
eROCKIT ही एक पेडल-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, ज्याला हायपरबाईक असेही म्हणतात. हे पेडलिंगसह सहजतेने फिरते. याचा टॉप स्पीड 90 किमी/तास पेक्षा जास्त आहे, यात ॲडव्हान्स बॅटरी आणि इलेक्ट्रीक डायरेक्ट ड्राइव्ह मोटरसह येतो.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड