4 new variants of Tata Nexon launched; You will get these awesome features, see price
Tata Nexon चे ४ नवे व्हेरिअंट लाँच; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 9:43 AM1 / 7टाटा मोटर्सनं (TATA Motors) आपल्या रांजणगाव येथील प्रकल्पात भारतातील पहिल्या GNCAP 5 स्टार रेडेट कारचा आनंद साजरा केला. तसंच यावेळी कंपनीनं 3 लाख नेक्सॉन (TATA Nexon) रोलआऊट केल्या.2 / 7जून 2021 मध्ये कंपनीतून 2 लाख कार रोलआऊट झाल्यानंतर टाटा मोटर्सनं केवळ ८ महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत नक्सॉनच्या 1 लाख युनिट्सचं रेकॉर्ड प्रोडक्शन केलं आहे. 3 / 7नेक्सॉन ही भारतातील आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. भारतातील टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक वाहन व्यवसायात नेक्सॉनने त्याच्या विभागातील सर्वाधिक योगदान दिले आहे. 4 / 7Tata Nexon EV चे आजपर्यंत 13500 पेक्षा अधिक ग्राहक आहेत. तसंच याचा बाजार हिस्सा 62 टक्क्यांहून (YTD) अधिक आहे.5 / 7हे यश साजरे करताना, कंपनीने यशस्वी कॉम्पॅक्ट SUV च्या टॉप ट्रिम्सचे 4 नवीन व्हेरिअंट XZ+ (P) / XZA+ (P) आणि XZ+ (HS) / XZA+ (HS) पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह रॉयल ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केले. हे व्हेरिअंट Dark एडिशनमध्येही सादर केले जाणार आहेत.6 / 7नुकत्याच लाँच झालेल्या काझीरंगा एडिशनसह, नेक्सॉन आता 40 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. याच्या मदतीनं ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. 7 / 7 या रेंजमध्ये 22 पेट्रोल व्हेरिअंट आणि 18 डिझेल व्हेरिअंट ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल पर्यायांसह उपलब्ध असतील. नवीन Tata Nexon किंमत 10.86 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. आणखी वाचा Subscribe to Notifications