8 SUVs to be launched this year including Jimny, Exter, Elevate before Diwali!
Jimny, Exter, Elevate सह या वर्षात लॉन्च होणार या 8 SUV; दिवाळी पूर्वीच बाजारात करणार धमाका! By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:14 AM1 / 8भारतीय कार बाजार आता पुन्हा एकदा पटरीवर आला आहे. अनेक नवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत आहेत. या वर्षात आत्तापर्यंत अनेक नवी वाहने लॉन्च झाली असून अद्याप काही वाहने लॉन्च होणे बाकी आहे. महत्वाचे म्हणजे, दिवाळीपूर्वी तब्बल 8 SUV लॉन्च होण्याची शक्यता आहे. 2 / 8Maruti Suzuki Jimny - मारुती सुझुकी आपली पाच-दरवाज्यांची जिमनी 7 जून रोजी भारतात लॉन्च करत आहे. जी Zeta आणि Alpha trims मध्ये विकले जाईल. जिमनीमध्ये 105PS आणि 134 Nm जनरेट करणारे 1.5L K15B पेट्रोल इंजीन असेल. जे 5-स्पीड MT आणि 4-स्पीड AT ला जोडले गेलेले असेल. यात AllGrip Pro 4WD सिस्टिम असेल.3 / 8Hyundai Exter ह्युंदाई एक्सटर जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही मायक्रो एसयूव्ही Tata Punch आणि Citroen C3 ला टक्कर देईल. या कारमध्ये 1.2L NA पेट्रोल इंजिन आसेल, जे 5-स्पीड MT आणि AMT ने जोडलेले असेल. या कारमध्ये सीएनजी पर्यायही असेल. ही कार सहा एअरबॅगसोबत येईल.4 / 8Honda Elevate - होंडाची अपकमिंग एलिव्हेट मिडसाईज एसयूव्ही लवकरच सादर होणार आहे. ही 5th-Gen City प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या एसयूव्हीमध्ये 1.5L पेट्रोल इंजिनसह हायब्रीड सिस्टिम मिळू शकते. ही कार बाजारात क्रेटा आणि ग्रँड विटारा सारख्या एसयूव्हीना टक्कर देईल. 5 / 8Tata Nexon Facelift - टाटा आपल्या नव्या नेक्सॉन फेसलिफ्टवर काम करत आहे. हिचे टेस्टिंग सुरू आहे. ही कार ऑगस्ट महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारसोबत 1.2L DI टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे सध्याच्या रेव्होट्रॉन युनिटच्या तुलनेत अधिक पॉवरफूल आणि टॉर्कियर असेल.6 / 8Kia Seltos Facelift - जुलै महिन्यात फेसलिफ्टेड किआ सेल्टॉस लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये रिव्हाइज्ड एक्सटीरिअरसह एडीएएस, रोटरी डायल, नवे एसी व्हेंट्स आणि पॅनोरमिक सनरूफ सारखे नवे फीचर्स असतील. यात 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन शिवाय नवे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनही असू शकते.7 / 8Toyota SUV Coupe - टोयोटा एसयूव्ही कूप आगामी काही महिन्यांतच लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार मारुती सुझुकी फ्रोंक्सवर बेस्ड असेल. या कारमध्ये हार्टेक्ट प्लॅटफॉर्म असेल. ही पाइव्ह-स्पीड एमटी आणि सिक्स-स्पीड एटी ऑप्शनसह 1.2 लिटर NA पेट्रोल आणि 1.0 लिटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येईल.8 / 8Tata Harrier/Safari Facelift - अपडेटेड Tata Harrier आणि Safari सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास लॉन्च केल्या जाऊ शकतात. या 1.5L DI टर्बो पेट्रोल इंजिनसह येऊ शकतात. यांचे डिझाईन हॅरिअर ईव्ही कॉन्सेप्ट प्रमाणे असू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications