शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ची कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी, नवरात्र-दिवाळीनिमित्त मिळतेय भरघोस सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 2:25 PM

1 / 10
Tata Cars Navratri & Diwali 2022 Offer : टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या कारवर नवरात्र, दसरा आणि दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत. ऑफरनंतर तुम्हाला या कंपनीच्या कार अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल. दरम्यान, कंपनीची ही ऑफर सर्व मॉडेल्सवर उपलब्ध नाही. कंपनी फक्त 5 मॉडेल्सवर ही सूट देत आहे.
2 / 10
ज्या मॉडेल्सवर सूट दिली जात आहे त्यात टाटा हॅरियर, टाटा सफारी, टाटा टियागो, टाटा टिगोर आणि टाटा नेक्सॉन यांचा समावेश आहे. या सवलतीमुळे ग्राहकांना 40 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. यामध्ये रोख लाभ, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. या वर्षी टाटा कारची मागणी सातत्याने वाढत आहे. विशेषत: पंच ही कार हॉट फेव्हरेट राहिला आहे.
3 / 10
टाटा सर्वात जास्त विक्री होण्याऱ्या SUV Nexon वर देखील सूट देत आहे. या SUV वर एकूण 20,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
4 / 10
त्याच वेळी, कंपनी आपल्या पेट्रोल व्हेरिएंटवर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. नेक्सॉनने ऑगस्टमध्ये मागणीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटालाही मागे टाकले आहे. कंपनीने नुकतेच याचे जेट एडिशनही लाँच केले आहे.
5 / 10
टाटा आपल्या सेडान टिगोरवर 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Tiago च्या XE आणि XM व्हेरिअंटवर 10,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
6 / 10
त्याच वेळी, Tigor च्या XZ आणि XZ+ व्हेरिअंटवर 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. टिगोरची एक्स-शोरूम किंमत 5.99 ते 8.58 लाख रुपयांदरम्यान आहे. ही एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.
7 / 10
टाटा आपल्या लोकप्रिय हॅचबॅक Tiago वर 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Tiago च्या XE आणि XT व्हेरिअंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
8 / 10
त्याच वेळी, Tiago च्या XZ Plus व्हेरिअंटवर 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. Tiago ची एक्स-शोरूम किंमत 5.39 ते 7.81 लाखांदरम्यान आहे. ही कार एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.
9 / 10
टाटा त्यांच्या दोन सर्वात प्रीमियम SUV, Harrier आणि Safari वर Rs 40,000 पर्यंत सूट देत आहे. कोणत्याही टाटा कारवर तुम्हाला मिळू शकणारी ही सर्वाधिक सूट आहे. कंपनी ही सूट एक्सचेंज बोनस म्हणून देत आहे. दोन्ही कार्सवर कंपनी समान ऑफर देत आहे. हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.69 लाख रुपये ते 22.04 लाख इतकी आहे. त्याच वेळी, सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.34 ते 23.5 लाख रुपये आहे.
10 / 10
टाटा त्याच्या सर्वात आवडत्या कॉम्पॅक्ट SUV पंचसह Altroz ​​वर कोणतीही सूट देत नाही. मात्र, गेल्या महिन्यात कंपनी Altroz ​​वर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत होती. त्याचप्रमाणे, टाटा टियागोच्या NRG आणि CNG मॉडेल्सवर कोणतीही सूट उपलब्ध नाही. टिगोरच्या सीएनजी मॉडेलवरही कोणतीही सूट नाही. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tigor EV, Nexon EV आणि Nexon EV Max वरदेखील कोणतीही सूट देत नाही.
टॅग्स :TataटाटाcarकारNavratriनवरात्रीDiwaliदिवाळी 2021