शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार खरेदीच्या विचारात असाल तर थांबा...! केवळ ₹1 लाखात लॉन्च होऊ शकते ही ढासू इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज करा, 192 KM पळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:16 IST

1 / 8
भारतात ईलेक्ट्रीक वाहनांची सध्या चलती आहे. अनेकजण नवीन गाडी घ्यायची असेल तर दुचाकी असो की चारचाकी ईलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय एकदातरी चाचपून पाहत आहेत. परंतू, सध्या ईलेक्ट्रीक वाहने खूपच महाग आहेत.
2 / 8
एमजी, टाटाच्या छोट्या कार या सात लाखांपासून सुरु होतात. पण जर तुम्हाला दैनंदिन वापरासाठी ईलेक्टीक वाहन ते देखील कार, ती देखील स्वस्तात हवी असेल तर लवकरच हा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
3 / 8
जशी रस्त्या रस्त्यावर ओलाची एस १ प्रो, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब दिसते तशीच लिगियर मिनी नावाची ईलेक्ट्रीक कार दिसण्याची शक्यता आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही कार स्कूटरपेक्षाही कमी किंमतीत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
4 / 8
लिगियर मिनी ईव्ही या कारची भारतात टेस्टिंग सुरु झाली आहे. ही दोन सीटर कार आहे. युरोपियन मॉडेलवर आधारित ही कार असून यामध्ये वेगवेगळे बॅटरी पॅक मिळण्याचा अंदाज आहे. या बॅटरीची रेंज ६३ किमी ते १९२ किमी एवढी असू शकते.
5 / 8
ही कार १ लाख रुपये सुरुवातीच्या किंमतीपासून उपलब्ध होऊ शकते. आज दुचाकी या लाख, दीड, दोन लाखांना मिळतात. ओलाने तर ६० हजारांपासून दुचाकी उपलब्ध केल्या आहेत.
6 / 8
लिगिअर मिनी ईव्ही कार दिसायला टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे. 2958 मिलीमीटर लांब, 1499 मिलीमीटर रुंद आणि 1541 मिलीमीटर ऊंच आहे. १३ ते १६ इंच अलॉय व्हील मिळू शकतात. मागच्या बाजुला होंडा ब्रिओसारखी मोठी काच मिळू शकते. मिनी कुपरसारख्या दिसणाऱ्या गोल लाईट, एलईडी डीआरएल यामुळे ही कार स्पोर्टी वाटते.
7 / 8
या कारमध्ये १० इंचाची टचस्क्रीन, पावर स्टेअरिंग, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, एसी व्हेंट आदी फिचर्स मॉडेलप्रमाणे मिळणार आहेत. 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh बॅटरी पॅक असतील.
8 / 8
लिगियर ही एक फ्रेंच ऑटोमोबाईल आणि मिनीबस निर्माता कंपनी आहे. माजी रेसिंग ड्रायव्हर आणि रग्बी खेळाडू गाय लिगियर (1930-2015) यांनी कंपनी स्थापन केली. मायक्रोकारच्या निर्मितीमध्ये या कंपनीचा हातखंडा आहे. लिगियर 1976 ते 1996 दरम्यान फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर