शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

180km ची रेंज अन् 80kmph ची टॉप स्पीड; लवकरच लॉन्च होणार 'ही' अनोखी EV स्कूटर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 8:10 PM

1 / 7
भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच अनेक वाहन उत्पादक आपली इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. या सेगमेंटमध्ये मोठे प्लेयर्स असूनही नवे खेळाडू नवनवीन आयडिया घेऊन यात दाखल होत आहेत. अलीकडच्या काळात, आपण अनेक नवीन कंपन्या बाजारात प्रवेश करताना पाहिल्या आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये अथर आणि ओला सारख्या कंपन्या आपला ठसा उमटवत आहेत.
2 / 7
2023 मध्ये आणखी बरेच खेळाडू या स्पर्धात्मक बाजारात प्रवेश करतील. त्यापैकी एक रिव्हर EV (River EV) सामील आहे. बंगळुरुस्थित स्टार्टअप सध्या या प्रोटोटाइप इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी करत आहे. या स्कूटरचे स्पाय शॉट्स सध्या इंटरनेटवर लीक झाले आहेत.
3 / 7
ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रिव्हर ईव्ही नावाने ओळखली जाईल. या स्कूटरची रचना यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरपासून प्रेरित असल्याचे जणावते. यात एक स्टाईलिश एलईडी डीआरएल आहे, जो स्कूटरला अनोखा लूक देतो.
4 / 7
स्कूटरच्या डिझाईनबद्दल फारसे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत, कारण ही स्कूटर चाचणी करताना दिसली तेव्हा ती पूर्णपणे झाकलेली होती. लॉन्च केल्यानंतर ती यामाहा निओ स्कूटरला टक्कर देईल अशी अपेक्षा आहे. स्कूटरमध्ये लगेज रॅक माउंटसह सिंगल-पीस ग्रॅब हँडल आहे.
5 / 7
या स्कूटरमध्ये फ्री-स्टँडिंग डिजिटल डिस्प्ले असू शकतो, जो टचस्क्रीन युनिट असण्याची शक्यता आहे. या स्कूटरच्या बॅटरी स्पेसिफिकेशन्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
6 / 7
रिव्हर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रेग्युलर टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स असण्याची अपेक्षा आहे, तर मागील बाजूस ड्युअल शॉक अबजॉर्बर किंवा सिंगल साइड युनिट असेल. हँडलबारवर दोन ब्रेक फ्लुइड बसवलेले असल्यामुळे समोर आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक असू शकतो. हँडलबारवर येत असल्याचे दिसल्यामुळे ही एक स्पोर्टी मोटरसायकल असण्याची शक्यता आहे.
7 / 7
रिव्हर EV स्टार्टअपची स्थापना 2020 मध्ये अरविंद मणी आणि विपिन जॉर्ज यांनी केली होती. या ब्रँडमागील कल्पना बहु-उपयुक्त इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे सांगितले जाते. रिव्हर इलेक्ट्रिक स्कूटर 180 किमी पर्यंतच्या श्रेणीचा दावा करते आणि 80 किमी/ताशी कमाल वेग घेऊ शकते. ही स्कूटर 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन