शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology: एक छोटीशी लवंग संपवू शकते तुमच्या जीवनातील अनेक समस्या, असा आहे चमत्कारिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 4:54 PM

1 / 6
ग्रह नक्षत्रांच्या दशा आणि दिशेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर पडतो ज्योतिष शास्त्रामध्ये जीवनातील समस्या संपुष्टात आणण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रहांना शांत करता येते. छोटीशी लवंग ही आरोग्याबरोबरच ज्योतिष उपायांसाठी विशेष लाभदायी ठरते.
2 / 6
धन, लाभ, संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भाग्य मजबूत करण्यासाठी लवंग उपयुक्त मानली जाते.
3 / 6
लवंगेच्या वापरामुळे राहु-केतूचा वाईट प्रभाव कमी केला जाऊ शकतो. कुंडलीमध्ये राहू केतू दोष असेल तर दर शनिवारी लवंगेचे दान केले पाहिजे.
4 / 6
तुम्ही शिवलिंगावरही लवंग अर्पण करू शकता. ४० दिवसांपर्यंत सातत्याने असे केल्याने सर्व वाईट प्रभाव संपुष्टात येतात.
5 / 6
कामानिमित्त बाहेर जात असाल तर घराबाहेर पडताना तोंडामध्ये दोन लवंगा ठेवून बाहेर पडा. तसेच आपल्या इष्टदेवाचं नामस्मरण करताना त्या कार्यात यशासाठी प्रार्थना करा. असं केल्याने तुम्हाला त्या कार्यात यश मिळू शकते.
6 / 6
यश मिळत नसल्यास मंगळवारी मारुतीच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यामध्ये दोन लवंगा घाला. त्यानंतर हनुमान चालिसेचा पाठ करा. असे सलग २१ मंगळवारी केल्यास मेहनतीला यश मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष