शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रक चालकांसाठी मोठी बातमी, लवकरच केबिनमध्ये AC बसणार; नितीन गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 4:56 PM

1 / 8
AC Cabins for Truck Drivers : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक क्षेत्राची सर्वात मोठी भूमिका असते. तसेच, दिवस-रात्र ट्रक चालवून वेळेत माल पोहचवणाऱ्या ट्रक चालकांचाही विचार झाला पाहिजे. हिवाळा असो उन्हाळा, चालक वेळेत माल पोहचवण्यासाठी खूप मेहनत घेतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
2 / 8
यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी ट्रक चालकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 2025 पासून सर्व ट्रक आणि कंटेनरच्या केबिनमध्ये AC बसवणे अनिवार्य होणार आहे. गडकरींच्या घोषणेमुळे ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
3 / 8
भारतात रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांचा जीव जातो. यात ट्रक-कंटेनरमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. दिवस-रात्र प्रवास करुन चालक थकलेला असतो, अनेकदा अपघाताचे कारण त्याचा हाच थकवा असतो.
4 / 8
पण, आता ट्रक चालकांचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्यांना उन्हाळ्यात आराम मिळावा, यासाठी गडकरींनी मोठे पाऊल उचलले आहे. व्होल्वो आणि स्कॅनिया सारख्या कंपन्या आधीपासून आपल्या हाय-एंड ट्रकमध्ये AC केबिन देतात.
5 / 8
गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर वाद सुरू असताना सोमवारी नितीन गडकरींनी ट्रक केबिनमध्ये एसी अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची घोषणा केली. याबाबत नितीन गडकरी म्हणाले की, 'भारतात काही चालक 12-14 तास ट्रक चालवतात.'
6 / 8
इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालवण्यासाठी काही तासांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आपल्या देशातील ट्रकचालक 43 ते 47 अंश तापमानात गाडी चालवतात. आपण या चालकांच्या स्थितीची कल्पना केली पाहिजे.'
7 / 8
'मी मंत्री झाल्यानंतर AC केबिन सुरू करण्याच्या विचारात होतो, पण त्यामुळे खर्च वाढणार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध केला. आता मी फाईलवर सही केली आहे, लवकरच केबिनमध्ये AC बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.'
8 / 8
काहींनी असा दावा केला की, यामुळे चालकाला गाडी चालवताना झोप येऊ शकते. पण, व्होल्वो बसेसच्या आगमनाने ही धारना मोडीत निघाली आहे. आता सर्व लक्झरी बसमध्येही चालकांसाठी एसी केबिन आहेत. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,' असंही ते म्हणाले.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनCentral Governmentकेंद्र सरकार