शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारीच! पेट्रोलची काळजी नाही, ट्रॅफिकचा त्रास नाही; इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 5:57 PM

1 / 9
शहरात कार चालवणे म्हणजे अडचण झाली आहे, कार चालवण्यापासून ते कार पार्किंग करेपर्यंत कसरत करावी लागते. यात ट्राफिकही मोठ्या प्रमाणात असतं. पण, आता याच टेन्शन दूर होणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण उडत्या कारची कल्पना ऐकली असेल. आता ती कार लवकरच येणार आहे. कारण उडत्या कार आता कल्पनेच्या पलीकडे रस्त्यावरून टेकऑफ करण्यासाठी सज्ज आहेत. आता एक इलेक्ट्रिक उडणारी कार येणार आहे. ही कार आकाशातही उडू शकते. आता या उडत्या इलेक्ट्रिक कारला प्रमाणपत्र आणि मान्यता मिळाली आहे.
2 / 9
यूएस स्थित अलेफ एरोनॉटिक्सने विकसित केलेल्या फ्लाइंग कारला अमेरिकन सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने घोषणा केली की, या ब्रँडच्या कार, 'मॉडेल ए' ला यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून एअर योग्यतेचे विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे कारण अमेरिकेत अशा प्रकारचे वाहन प्रथमच प्रमाणित करण्यात आले आहे.
3 / 9
ही कार पूर्णपणे कार्यरत इलेक्ट्रिक कार आहे जी तुम्ही रस्त्यावर चालवू शकता तसेच आकाशातही उडवू शकता. कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'FAA इलेक्ट्रिकल वर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (eVTOL) वाहने तसेच ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या धोरणांवर सक्रियपणे काम करत आहे.'
4 / 9
अलेफ एरोनॉटिक्सने 2016 मध्ये या कारचा पहिला प्रोटोटाइप तयार केला होता. हे एक असे वाहन आहे जे कारसारखे चालविण्याव्यतिरिक्त, उभ्या टेकऑफ आणि लँडिंग देखील करू शकते, जसे आपण हेलिकॉप्टरमध्ये पाहिले असेल.
5 / 9
कंपनीचा दावा आहे की 'मॉडेल ए' ची ड्रायव्हिंग रेंज 200 मैल किंवा सुमारे 321 किमी आहे आणि कार हवेत 110 मैल किंवा 177 किमी पर्यंत प्रवास करू शकते.
6 / 9
या इलेक्ट्रिक फ्लायक कारची किंमत 300,000 डॉलर्स भारतीय चलनात सुमारे 2 कोटी 46 लाख रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्याची विक्री ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत 440 हून अधिक युनिट्स बुक झाल्या आहेत.
7 / 9
Aleph Aeronautics 2019 पासून त्याच्या प्रोटोटाइपची चाचणी करत आहे. असे सांगितले जात आहे की 2025 च्या चौथ्या तिमाहीत त्याचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.
8 / 9
कंपनी आणखी एका इलेक्ट्रिक फ्लाइंग सेडान कारवर काम करत आहे, ज्यामध्ये एकाच वेळी चार लोक बसू शकतात. कंपनीने या कारचे नाव 'मॉडेल झेड' असे ठेवले आहे.
9 / 9
अहवालानुसार, मॉडेल Z ची फ्लाइंग रेंज 300 मैलांपेक्षा जास्त आणि ड्रायव्हिंग रेंज 200 मैलांपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. 2035 पर्यंत बाजारात आणण्याचे नियोजन आहे.
टॅग्स :Automobileवाहनcarकार