All New Kia K8 Flagship Sedan Unveiled Boasts Brands New Logo see first look and know about launch
Kia K8 चा First Look आला समोर; सेडान सेगमेंटमध्ये वाढणार स्पर्धा, पाहा लाँचबद्दल कंपनी काय म्हणाली? By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 12:36 PM1 / 10Kia कॉर्पोरेशननं बुधवारी K8 चा पहिला अधिकृत लूक जारी केला. भविष्यासाठी नवी उद्देश आणि महत्त्वाकांक्षा सांगणारं हे पहिलं मॉडेल असल्याचं कंपनीनं सांगितलं.2 / 10K8 हे Kia चे नवे मॉडेल आहे जे ब्रॅडचे नवे डिझाईन आयडेंटिटी आणि नव्या लोगोसह येत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 3 / 10K8 चा फोकस मॉडर्न, प्रिमिअम क्वालिटी आणि डायनॅमिक परफॉर्मन्सवर असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं. तसंच K8 ही एक सेडान कार आहे, ज्यामध्ये उत्तम परफॉर्म्स आणि नवं डिझाईनही देण्यात आलं आहे. 4 / 10पुढील बाजुला नवा सिग्नेचर फ्रेमलेस टायगर नोझ देण्यात आलं आहे. तसंच यात फ्रेमलेस ग्रिलही देण्यात आलं असून ते फ्रन्ट बंपरसह इंटिग्रेटेड आहे. यामुळे या कारचा लूकही उठून दिसतो.5 / 10फ्रंट लँपमध्ये एक टर्न सिग्नलदेखील देण्यात आला आहे. K8 च्या पुढील बाजूला टायगर नोझ ग्रिलवर Kia चा नवा लोगो देण्यात आला आहे.6 / 10Kia K8 सेडान कारमध्ये अत्याधुनिक डिझाईन आणि प्रिमिअम क्वालिटीच्या मटेरिअलचा वापर केला असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. K7 ही कार यशस्वी झाल्यानंतर कियानं ही नवी कार समोर आणली आहे.7 / 10Kia K8 ला नुकतंच कंपनीनं शोकेस केलं आहे आणि याचं प्रोडक्शन व्हर्जन याच वर्षी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतं. गेल्या महिन्यात कंपनीनं आपल्या कॉर्पोरेट नावासह आपला लोगोही बदलला होता. आता या नव्या सेडान कारमध्ये कंपनी आपल्या नव्या ब्रँड लोगोचा वापर करत आहे. तो एका सिग्नेचर म्हणजेच स्वाक्षरीप्रमाणे दिसत आहे. 8 / 10जशी ही कार बाहेरून आकर्षक दिसत आहे. त्याच प्रमाणे आतूनही ही कार आकर्षक असेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याचं केबिनदेखील उच्च गुणवत्ता असलेल्या मटेरिअलपासून तयार करण्यात आलं असून ते आतूनही कारला प्रिमिअम लूक देत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.9 / 10सध्या या कारशी निगडीत कोणत्याही तांत्रिक बाबीची माहिती देण्यात आली नाही. परंतु जागतिक बाजारपेठेत लवकरच ही कार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 10 / 10'कंपनी नव्या रूपात जागतिक बाजारपेठेत आपलं अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. कंपनीनं नुकतंच रिब्रँडिंगसह नव्या मॉडर्न सेडानला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईननं तयार करण्यात आलं आहे. यामुळे ब्रँड व्हॅल्यू आणखी उत्तम बनवण्यास मदत होईल,' असा विश्वास किया ग्लोबल डिझाईन सेंटरचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड करिम हबीब यांनी सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications