शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Alto K10 CNG Launched: सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच झाली मारुतीची ही कार; पाहा किंमत आणि फीचर्स, टियागोला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:55 AM

1 / 7
Alto K10 CNG Launched: देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नुकतीच अल्टो K10 S-CNG व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. ही कार VXI व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
2 / 7
या कारची किंमत ₹ 5,94,500 (एक्स-शोरूम) आहे. नवीन Alto K10 ची S-CNG व्हेरिअंटमध्ये के सीरिज 1.0L Dual Jet, VVT इंजिन देण्यात आले आहे. ही कार 5300RPM वर 41.7 ची कमाल पॉवर आणि CNG मोडमध्ये 3400RPM वर 82.1Nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कार CNG वर 33.85 किमी/किलो मायलेज देते.
3 / 7
मारुतीने 10 लाख पेक्षा अधिक कार्सची विक्री केली आहे. नवी ऑल्टो के 10 सीएजीमुळे प्रदुषण कमी करण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया मारुती सुझुकी इंडियाचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव यांनी लाँच दरम्यान दिली. या कारमध्ये AUX आणि USB पोर्ट्स, सेंट्रल लॉकिंग, रूफ अँटेना, फ्रंट पॉवर विंडो, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, स्पीड-सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, बॉडी-कलर डोअर हँडल, मॅन्युअली अॅडजस्टेबल विंग मिरर सारखे फीचर्स देण्यात आलेत.
4 / 7
2022 मारुती अल्टो K10 Std, LXi, VXi आणि VXi+ यासारख्या चार मॅन्युअल आणि दोन AMT व्हेरिअंटमध्ये येते. Std या व्हेरिअंटची किंमत त्रु. 3.99 लाख, LXi रु.4.82 लाख, VXi रु. 5.00 लाख आणि VXi+ साठी तुम्हाला रु. 5.34 लाख रुपये एक्स शोरूम मोजावे लागणार आहेत.
5 / 7
VXi AMT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 5.50 लाख आहे, तर त्याच्या टॉप मॉडेल VXi+ AMT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 5.84 लाख आहे आणि आता नवीन VXi CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5,94,500 रुपये आहे.
6 / 7
नवीन Alto K10 CNG सह, मारुतीकडे देशात सर्वाधिक 13 S-CNG मॉडेल्स उपलब्ध आहेत. यापूर्वी अर्टिगा, बलेनो, XL6, Alto 800, स्विफ्ट, डिझायर, Alto K10, एस-प्रेसो, टुअर एस, वॅगन आर, इको, सेलेरिओ, सुपर कॅरी उपलब्ध आहेत.
7 / 7
Alto K10 CNG कार बाजारात टाटा Tiago CNG कारला टक्कर देईल. या कारमध्ये 1199 cc इंजिन आहे, जे 6000 rpm वर 72bhp पॉवर आणि 3500 rpm वर 95 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचा एकच पर्याय उपलब्ध आहे. सीएनजीवर कार 26.49 किमी/किलो मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.80 लाख रुपये आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा