शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anand Mahindra, SsangYong Motor Fail: रतन टाटांना जे जमले, ते आनंद महिंद्रांना नाही; 12 वर्षांनी विकावी लागली ही बडी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 8:59 AM

1 / 8
महिंद्रा अँड महिंद्राची दक्षिण कोरियाई कंपनी SsangYong Motor अखेर विकली गेली आहे. आनंद महिंद्रांच्या कंपनीला ही कंपनी डोईजड झाली होती. यामुळे ही कंपनी कधी एकदा विकून दगडाखाली अडकलेले हात सोडवितो, असे महिद्राला झाले होते.
2 / 8
गेल्या बऱ्याच काळापासून महिंद्रा ही कंपनी विकण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, कोणी खरेदीदार मिळत नव्हता. अखेर कोरियाच्या काही कंपन्यांनी एकत्र येत ही कंपनी खरेदी केली आहे.
3 / 8
हे प्रकरण अनेक महिन्यांपासून न्यायालयात होते. महिंद्रा समूहाला खरेदीदार न मिळाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. आता स्थानिक कंपन्यांच्या संघाने 305 अब्ज वॉन (सुमारे $ 254.56 दशलक्ष डॉलर) SsangYang मोटर खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. महिंद्राने ही कंपनी 12 वर्षांपूर्वी 2010 मध्ये घेतली होती.
4 / 8
महिंद्रा समूह बऱ्याच काळापासून SsangYang Motor मध्ये पैसे गुंतवत होता, परंतु त्यांना योग्य परतावा मिळत नव्हता. यानंतर महिंद्रा ग्रुपने एप्रिल 2020 मध्ये निर्णय घेतला की आता या कंपनीत पैसे गुंतवले जाणार नाहीत.
5 / 8
यानंतर महिंद्राने खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली. सन 2020 संपण्यापूर्वीच, SsangYang Motor ला 100 अब्ज वॉनच्या कर्जामुळे दिवाळखोरीचा खटला दाखल करावा लागला होता.
6 / 8
नंतर, कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटात सांगयांग मोटरची परिस्थिती आणखीनच बिघडली. कंपनीची विक्री सतत कमी होत गेली आणि 2021 मध्ये केवळ 84 हजार युनिट्सची विक्री झाली. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 21 टक्के कमी होते. 2021 मध्ये, पहिल्या नऊ महिन्यांत 238 अब्ज वॉनचे ऑपरेटिंग नुकसान झाले.
7 / 8
SsangYong मोटर ताब्यात घेतल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राने SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण स्वीकारले, जे यशस्वी झाले नाही. ही 70 वर्षे जुनी कंपनी 1988 मध्ये SsangYong बिझनेस ग्रुपने Dong-A Motor कडून विकत घेतली होती. नंतर देवू मोटर्स आणि SAIC ने विकत घेतली, ज्यांच्याकडून महिंद्राने ते विकत घेतली. आता ही दशके जुनी कंपनी पुन्हा नव्या मालकाकडे गेली आहे.
8 / 8
महत्वाचे म्हणजे महिंद्रांनी ही सांगयांग मोटर्स कंपनी विकत घेण्य़ापूर्वी दोन वर्षे आधी रतन टाटांनी अमेरिकेची जग्वार लँड रोव्हर ही कंपनी विकत घेतली होती. टाटा मोटर्स आजही या कंपनीत गुंतवणूक करत आहे. मात्र, या कंपनीकडून अद्ययावत तंत्रज्ञान, डिझाईन आणि दणकट बांधणी आदी गोष्टी टाटाने आपल्या कारमध्ये वापरल्या आहेत. यामुळे टाटाला हा सौदा तोट्याचा जरी असला तरी टाटा मोटर्सच्या वाढीला फायद्याचाच ठरला आहे. नेमकी ही गोष्ट महिंद्रा कंपनीला जमलेली नाही.
टॅग्स :Mahindra ssangyongमहिंद्रा सॅनगाँगAnand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्रा