शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाण्यात कार १० मिनिटं बुडाली तरी डोअर-विंडो उघडणं गरजेचं, पाहा काय आहे नवी सेफ्टी टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 2:48 PM

1 / 6
ANCAP Vehicle Submergence Test: आतापर्यंत तुम्ही वाहनाच्या क्रॅश टेस्टबद्दल ऐकले असेल. अपघात झाल्यास तुमचे वाहन किती सुरक्षित आहे हे या चाचणीतून दिसून येते. म्हणजेच त्याच्या एअरबॅग्जनं काम केलं का नाही. अशा स्थितीत आता वाहनांच्या सुरक्षेची पुढील स्तरावरील चाचणी सुरू होणार आहे.
2 / 6
ऑस्ट्रेलियन इंडिपेंडंट क्रॅश टेस्टिंग अथोरिटीने (ANCAP) ने सांगितले आहे की ते जानेवारी 2023 पासून कारची सबमर्जेस टेस्ट सुरू करणार आहेत. ही चाचणी तुमची कार पाण्यात पडल्यावर, बुडताना किती सुरक्षित आहे हे सांगेल. त्याचे भाग नीट काम करत आहेत की नाही हेदेथील याद्वारे समजणार आहे.
3 / 6
कार उत्पादकाना वाहन पाण्यात बुडाल्यानंतर १० मिनिटांपर्यंत प्रवाशांना दरवाजे आणि इलेक्ट्रीक विंडो उघडता येईल याचे पुरावे द्यावे लागतील. जणेकरून प्रवाशांना सुरक्षित रित्या बाहेर पडता येईल, असं ANCAP नं सांगितलं.
4 / 6
वाहन पाण्यात बुडल्यावर दरवाजे किंवा खिडक्या उघडत नसल्यास, निर्मात्यांनी अशी पद्धत प्रदान केली पाहिजे जी त्यांना ते सहज आणि सुरक्षितपणे तोडता येतील. याचा उल्लेख कारच्या मॅन्युअल गाईडमध्ये केला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलंय.
5 / 6
व्हेईकल सबमर्जेस टेस्ट ANCAP च्या अडल्ट प्रोटेक्शन एरियाचा भाग असेल. टेस्टिंग अथोरिटी चाईल्ड प्रेझेंट डिटेक्शन सिस्टमसाठी नवीन फीचर सुरू करेल.
6 / 6
हे सिस्टम मागील सीट आणि दरवाजाला मॉनिटर करेल. जर लहान मुल कारमध्ये लॉक झालं, तर याद्वारे कार चालकाला माहिती मिळेल. याद्वारे ड्रायव्हरच्या फोनवर अलर्टही जाईल.
टॅग्स :carकार