शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aston Martin DBX707: जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी एसयूव्ही कार, केवळ ३.३ सेकंदात घेते १०० किमी वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 2:08 PM

1 / 6
ब्रिटिश लक्झरी कार निर्माता मार्की एस्टोन मार्टिनने आपली नवी एसयूव्ही कार जगासमोर आणली आहे. तिचे नाव डीबीएक्स ७०७ आहे. ही कार जगातील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही कार असल्याचा दावा केला जात आहे.
2 / 6
Aston Martin DBX707 ही कार पॉवरफुल इंजिनसह तयार करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने ६९७ एचपीची पीक पॉवर मिळते. तसेच त्याच्या मदतीने ही कार केवळ ३.३ सेकंदामध्ये ०-१०० किमी प्रतितास वेग मिळतो.
3 / 6
Aston Martin DBX707 एसयूव्हीची किंमत ही २.३२ लाख डॉलर आहे. कंपनी याचे उत्पादन या वर्षीच्या पहिल्या तिमाहीपासून सुरू करण्याची शक्यता आहे.
4 / 6
Aston Martin DBX707 या लक्झरी एसयूव्ही कारची स्पर्धा Porsche Cayenne Turbo GT आणि Lamborghini Urus शी होणार आहे.
5 / 6
Aston Martin DBX707च्या इंजिनाचा विचार केल्यास यामध्ये ४.० लीटरचे व्ही८ इंजिन मिळते. जे ६९७ एचपी एवढी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच ही ९०० एनएमचा टॉर्क निर्माण करू शकते. कंपनीने यामध्ये क्वाड एक्झिट एक्झोस्ट सिस्टिमचा वापर केला आहे.
6 / 6
Aston Martin DBX707 एसयूव्ही कारमध्ये स्टँडर्ड २२ इंचच्या व्हिल्सचा वापर करण्यात आला आहे. तर युझर्स आपल्या सोईनुसार २३ इंचच्या व्हील्सनाही सिलेक्ट करू शकतात.
टॅग्स :carकारAutomobileवाहन