Ather 450X vs Ola S1 Pro vs Okinawa Praise Pro: Which electric scooter to choose
Electric Scooter Selection: कन्फ्यूज होऊ नका! ओला, ओकिनावा की एथरची ईलेक्ट्रीक स्कूटर बेस्ट? By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 10:40 AM1 / 11सध्या इलेक्ट्रीक स्कूटरचा सुकाळ सुरु आहे. एवढ्या कंपन्या आणि एवढ्या स्कूटर लाँच होत आहेत की, लोकांना ही घेऊ की ती घेऊ, कोणती चांगली? नंतर पस्तावायला तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत.2 / 11 जसे नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त असे स्मार्टफोन येत जात असतात, तशीच परिस्थिती या इलेक्ट्रीक स्कूटरची राहणार आहे. यामुळे जेव्हा तुम्हाला घ्यायची असेल तेव्हा तुम्ही ती अद्ययावत असलेलीच घ्या. सध्या बाजारात तीन स्कूटरना मोठी मागणी आहे. ओला, ओकिनावा आणि एथरच्या या स्कूटर आहेत. 3 / 11ओला एस१ प्रोने खूप प्रसिद्धी मिळविली आहे. तर एथरची ४५० स्कूटर काही वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर आहे. ओकिनावाच्या आय प्रेज प्रो स्कूटरला देखील मोठी मागणी आहे. यात तुमच्यासाठी चांगली स्कूटर कोणती ते जाणून घेऊयात. 4 / 11Okinawa i-Praise Pro इलेक्ट्रिक स्कूटर डिटेचेबल 2.0kwh लिथियम बॅटरी देण्यात आली आहे, जी कुठेही चार्ज केली जाऊ शकते. स्कूटरच्या बॅटरीसोबत 5 amp चा चार्जर देण्यात आला आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. एका चार्जवर ही स्कूटर 88 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. त्याचा टॉप स्पीड 58 किलोमीटर प्रति तास आहे.5 / 11स्कूटर E-ABS (इलेक्ट्रॉनिकली-असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम) ने सुसज्ज आहे. ओकिनावाने स्कूटरसाठी खास अॅपही विकसित केले आहे. ओकिनावा इको अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. Okinawa Praise Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 79,845 रुपये एक्स-शोरूम आहे. अॅपमध्ये जिओ फेन्सिंग, व्हर्च्युअल स्पीड लिमिट, कर्फ्यू अवर्स, बॅटरी हेल्थ ट्रॅकर, एसओएस नोटिफिकेशन्स, मॉनिटरिंग, ट्रिप, डायरेक्शन्स, मेंटेनन्स आणि व्हेईकल स्टेटस यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 6 / 11जिओ फेन्सिंगद्वारे, वापरकर्ते 50 मीटर ते 10 किमीची रेंज सेट करू शकतात आणि वाहनाने ही मर्यादा ओलांडताच, मोबाइलवर अलर्ट येऊ लागतील. व्हर्च्युअल स्पीड लिमिटद्वारे स्पीड अलर्ट मिळणे सुरू होईल.7 / 11बंगळुरू-आधारित EV निर्मात्या Ather Energy ची Ather 450X ही भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे म्हटले जाते. Ather 450X, त्याच्या नवीन व्रॅप मोडमध्ये, 3.5 सेकंदांत 0-40 किमी प्रतितास या सर्वोच्च वेगाचा दावा करते. लिथियम-आयन बॅटरी पॅकमध्ये नवीन 6kW, 26Nm PMS मोटर आणि नवीन 21,700 सेल वापरून कंपनीने हे यश मिळवले आहे. Ather 450X ची रिअल-वर्ल्ड ड्राइव्ह रेंज इको मोडमध्ये 85 किमी आणि राइड मोडमध्ये 70 किमी आहे.8 / 11यात 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देखील आहे, जो 1.3GHz स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा वापर करतो. तसेच यातील सॉफ्टवेअर Android ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टमवर तयार केले आहे. ब्लूटूथ आणि इंटिग्रेटेड 4G LTE सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देते. Ather 450X ची किंमत 1,13,416 रुपयांपासून सुरू होते आणि 2 प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. Ather 450 Plus आणि टॉप व्हेरिएंट Ather 450X ची किंमत 1,32,426 रुपये आहे.9 / 11ईव्ही स्टार्टअप ओला इलेक्ट्रिकने ऑगस्टमध्येच त्यांची S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,29,999 रुपये आहे. ओला इलेक्ट्रिकने नवीन बॅटरी पॅकसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो लॉन्च केले आहेत. 10 / 11Ola S1 मध्ये 2.98 kWh चा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे तर Ola S1 Pro स्कूटरमध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Ola S1 पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमी पर्यंत चालवता येते आणि त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. Ola S1 Pro एका चार्जवर 180 किमी पर्यंत चालवता येतो. त्याचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. परंतू कंपनीने ग्राहकांच्या हातात स्कूटर येताच ती 135 किमीची खरी रेंज देत असल्याचा खुलासा केला आहे.11 / 11या तिन्ही स्कूटरचा अंदाज घेतल्यास तुम्हाला जास्त रेंज हवी असेल तर ओला एस १ प्रो, आणि कमी किंमतीत चांगली स्कूटर हवी असेल तर Okinawa i-Praise Pro या स्कूटरची निवड करता येईल. एथरची स्कूटर जास्त किंमतीला मिळते व कमी रेंज देते. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रातील जुनी कंपनी म्हणून तुम्ही एथरची स्कूटर निवडू शकता. परंतू एथर पेक्षा काही हजार जास्त असलेली ओला एस१ प्रो निवडणे चांगला पर्याय ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications