Audi e Tron GT RS e Tron GT launched in India prices start at Rs 1 80 crore
भारतात लाँच झाली ही पॉवरफुल Electric Car; 500kms ची ड्रायव्हिंग रेंज, 22 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 3:39 PM1 / 8बुधवारी भारतीय बाजारपेठेत Electric Vehicle सेगमेंटमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीची एन्ट्री झाली. जर्मनीची प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Audi नं भारतीय बाजारपेठेत आपली दमदार इलेक्ट्रीक कार e-tron GT लाँच केली. 2 / 8आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेली ही इलेक्ट्रीक कार S आणि RS या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. 3 / 8Audi e-tron GT मध्ये कंपनीनं दोन इलेक्ट्रीक मोटर्सचा वापर केला आहे. याच्या S व्हेरिअंटची मोटर 469bhp ची पॉवर आणि 630Nm चा टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे RS व्हेरिअंट 590bhp ची पॉवर आणि 830Nm चा टॉर्क जनरेट करते. 4 / 8दोन्ही व्हेरिअंटमझ्ए फोर व्हिल स्टिअरिंग स्टँडर्ड म्हणून देण्यात आलं आहे. S व्हेरिअंट सिंगल चार्जमध्ये 500 किमी आणि RS व्हेरिअंट 481 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.5 / 8कंपनीने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे, एलईडी हेडलॅम्प्सपासून 20-इंच अलॉय व्हील्स, एलईडी टेललाइट्स, 12.3-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, प्रीमियम अपहोल्स्ट्री इत्यादींचा यात समावेश करण्यात आला आहे.6 / 8या कारमध्ये इको आणि डायनॅमिक हे दोन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. या कारच्या S व्हेरिअंटची किंमत 1.80 कोटी रूपये आणि RS व्हेरिअंटची किंमत 2.05 कोटी रूपये एक्स शोरूम असणार आहे. 7 / 8कंपनीचा दावा आहे की या कारचं एस व्हेरिएंट इतकं शक्तिशाली आहे की ते केवळ 4.1 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकतं. या कारता टॉप स्पीड 245 किमी/तास आहे.8 / 8दुसरीकडे, RS व्हेरिएंट 0 ते 100 किमी प्रतितास हा वेग केवळ 3.3 सेकंदात पकडू शकते. या कारमध्ये 250 किमी/तास इतका टॉप स्पीड देण्यात आला आहे. या कारची बॅटरी फक्त केवळ २२ मिनिटांत फुल चार्ज होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications