Auto Expo 2020: Maruti reveals new Gypsy; Great features
Auto Expo 2020: मारुतीनं दाखवली नव्या Jimniची झलक; फीचर्स जबरदस्त By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 9:36 PM1 / 6परदेशी बाजारात मागणी असलेली Suzuki Jimni SUV भारतात प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. परंतु भारतात ती अद्याप विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कंपनीनंसुद्धा भारतातल्या या गाडीच्या लाँचिंगसंदर्भात अद्यापही अधिकृतरीत्या काहीही सांगितलेलं नाही.2 / 6 पण Jimny भारतात आली असून, ग्रेटर नोएडामधील Auto Expo 2020मध्ये तिला प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. Suzuki Jimniला 2018मध्ये जगभरात सादर करण्यात आलं होतं. परदेशात अनावरण करण्यात आलेल्या या Jimniला जवळपास दीड वर्षानंतर भारतात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. 3 / 6 भारतात सादर करण्यात आलेली Jimni चौथ्या पिढीची असून, तिला तीनच दरवाजे आहेत. सुझुकी जिम्नीची 194 देशांमध्ये विक्री केली जाते. जपानमध्ये उपलब्ध असलेली जिम्नी 660सीसी, तीन-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर 4-सिलिंडरच्या आवृत्तीत पेट्रोल इंजिनसोबत येते. 4 / 6ग्लोबल मार्केटमध्ये 1.5 लीटर जिम्नीला जास्त मागणी आहे, जी 6000 RPMवर 104 बीएचपी पॉवर आणि 4000 RPMवर 140 एनएमचं टॉर्क निर्माण करते. जी 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स पर्यायांमध्ये येते. 5 / 6जिम्नीमध्ये लॅडर फ्रेम चेसिस देण्यात आली आहे. यात पार्टटाइम 4WD ( Suzuki Allgrip Pro 4WD technology) सेटअप बसवण्यात आला आहे. ज्यात तीन पर्यायही उपलब्ध आहेत. तसेच 3-लिंक एक्सल सस्पेंशनसुद्धा देण्यात आलं आहे. 6 / 6 जिम्नीमध्ये हायब्रिड डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध नाही. याची लांबी 3550 एमएम, रुंदी 1645 एमएम आणि उंची 1730 एमएम आहे. त्याचा व्हीलबेस 2250 एमएमचा आहे. तसेच यात सुझुकी सेफ्टी सपोर्ट सिस्टीमही बसवण्यात आलं आहे. मागच्या दारानं येणाऱ्या या जिम्नीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 7 ते 8 लाखांदरम्यान असू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications