Auto Expo 2020: Tata Motors pavilion is so excited; Harrier, Sierra and mini suv HBX in baton
Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 3:10 PM1 / 9Auto Expo 2020 मध्ये टाटा मोटर्सच्या पॅव्हेलिअनकडे अनेकांची पावले वळू लागली आहेत. कारणही तसेच आहे. टाटाने हॅरिअरचे बीएस6 मानकांमधील मॉडेल लाँच केले आहे. तर आणखी एक कार 7-सीटर एसयूव्ही Gravitas ही आकर्षण आहे. याचबरोबर आणखी काही लक्ष वेधून घेणाऱ्या कार टाटाने प्रदर्शनात ठेवल्या आहेत. 2 / 9टाटाने मिनी एसयुव्ही Tata HBX चे जवळपास प्राडक्शन मॉडेल लाँच केले आहे. याचबरोबर Tata Sierra चे इलेक्ट्रीक मॉडेलही ठेवले आहे. टाटाने आज हॅरिअर लाँच केली. 3 / 9या एसयुव्हीची किंमत 13.69 लाखांपासून 20.25 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामध्ये मॅन्युअल, अॅटोमॅटीक, ड्युअल टोन आणि डार्क रंगामध्येही ही कार उपलब्ध करण्यात आली आहे. 4 / 9यानंतर टाटाने हैरियर एसयूव्हीची 7 सीटर कार आणली आहे. या कारला बझार्डम्हणून टाटाने जिनिव्हा एक्स्पोमध्ये दाखविले होते. या एसयुव्हीची लांबी हॅरिअरच्या तुलनेत वाढविण्यात आली आहे. या कारमध्ये बीएस 6 चे 2.0 लीटरचे इंजिन देण्यात येणार आहे जे हॅरिअरमध्येही आहे. 5 / 9टाटाची तिसरी कारही आकर्षण राहिली आहे. ही मिनी एसयुव्ही आहे. ही कार नेक्सॉनपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्यात येणार आहे. 6 / 9यामध्ये ह्रॅरिअरसारखे डीआरएल देण्यात आले आहेत. यामध्ये टाटाच्या नव्या इम्पॅक्ट 2.0 चा बेस देण्य़ात आला आहे. 7 / 9टाटाची 90 च्या दशकातील सियारा एसयुव्ही पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी तयार झाली आहे. टाटाने सियाराचे इलेक्ट्रीक मॉडेल दाखविले आहे. 8 / 9महत्वाचे म्हणजे ही तीन दरवाजांची कार आहे. उजव्या बाजुला मागे दरवाजाच दिलेला नाही. 9 / 9तसेच या कारचे इंटेरिअरही सर्वात वेगळे आहे. यामध्ये रिअर बेंचसोबत लाऊंजसारखा एरिआ देण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications