auto expo 2023 mg company showcased euniq 7 hydrogen fuel cell car with 600 km range
Auto Expo 2023: पेट्रोल-डिझेल-CNG विसरा! आता येतेय हायड्रोजन फ्यूल कार; ६०० किमीपेक्षा अधिकची रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 2:32 PM1 / 9नवी दिल्लीत Auto Expo 2023 सुरू आहे. भारतीय कार निर्माता कंपन्यांसह जगभरातील कंपन्यांनी आपल्या कार या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात सादर केल्या आहेत. मात्र, या ऑटो एक्स्पोमध्ये एका कंपनीने सादर केलेली कार आकर्षणाचा विषय ठरत आहे. 2 / 9आताच्या घडीला पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर सीएनजीचे दरही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याला पर्याय म्हणून एका कंपनीने थेट हायड्रोजन इंधनाचा पर्याय असलेली कार लॉंच केली आहे.3 / 9ब्रिटिश कार उत्पादक MG Motorने ऑटो एक्सपो २०२३ मध्ये आपली हायड्रोजन फ्लूल-सेल कार सादर केली आहे. या कारचे नाव Euniq 7 असे आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार ६०५ किलोमीटरपेक्षा जास्तचे मायलेज देईल.4 / 9MG Motorने सादर केलेल्या Euniq 7 च्या पॉवरट्रेनमध्ये इलेक्ट्रोकेमिकल पॉवर जनरेशन डिव्हाईस, हायड्रोजन स्टोरेज डिव्हाईस आणि इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टीम वापरण्यात आली आहे. या कारचे पॉवर आउटपुट सुमारे १५०kW आहे. त्याच्या हायड्रोजन सिलेंडरची क्षमता ६.४ किलोग्रॅम आहे. या कारमध्ये पूर्ण इंधन भरण्यासाठी फक्त ३-५ मिनिटे लागतात, असे सांगितले जात आहे. 5 / 9MG Motor च्या Euniq 7 या कारमध्ये LED हेडलॅम्प्स, मोठे आणि आकर्षक ग्रिल पाहायला मिळते. फ्लॅट प्रोफाइलला सरकते दरवाजे आणि रियरला असलेला टेल लॅम्पचा सेटअप कारच्या लुक शानदार बनवत आहे.6 / 9Euniq 7 ही कार 2+2+3 कॉन्फिगरेशनसह सात आसनांच्या क्षमतेसह सादर करण्यात आली आहे. या कारला पॅनोरामिक सनरूफ, ऑल-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह आधुनिक डॅशबोर्ड देण्यात आला आहे. 7 / 9Euniq 7 ही कार एमपीव्ही प्रकारमध्ये सादर करण्यात आली आहे. एका रिफिलिंगमध्ये ६०० किमीची रेंज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हायड्रोजन फ्युल सेल कार इतर इंधन कारच्या तुलनेत कमी प्रदूषण निर्माण करतात, असे सांगितले जात आहे.8 / 9MG Motor कंपनीची Euniq 7 कार अद्याप भारतात लॉंच करण्यात आलेली नाही. ही कार उत्पादनासाठी पूर्णपणे तयार आहे. आगामी काळात लवकरच ही कार भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.9 / 9Auto Expo 2023 मध्ये टाटा, मारुती, महिंद्रा, ह्युंदाई यांसह अनेक कंपन्या आपल्या वैविध्यपूर्ण कार कॉन्सेप्ट सादर करत आहेत. तसेच भविष्यात भारतीय मार्केटमध्ये लॉंच करण्यात येणाऱ्या कारही सादर करण्यात येत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications