शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

30 मिनिटांत 500 किमीची रेंज! Tata च्या या इलेक्ट्रिक कार करणार धूम; पाहा PHOTO, फीचर्स अन् खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 12:18 PM

1 / 11
टाटा मोटर्स यावेळच्या ऑटो एक्सपोमध्ये आपल्या नव्या कार सादर करण्याच्या तयारीत आहे. यावेळी आपल्याला टाटाच्या पोडियमवर पंच इलेक्टिकपासून ते काही कॉन्सेप्ट मॉडेलही बघायला मिळतील. कंपनी आपल्या दोन नव्या कन्सेप्ट Curvv आणि Avinya देखील सादर करेल. कंपनी टाटा कर्व्हला आपल्या फ्यूचर मिड-साईज एसयूव्हीच्या स्वरुपात सादर करेल असे बोलले जात आहे. ही कार पारंपरिक ईंधन (ICE) आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही पॉवरट्रेनसह भविष्यात बाजारात येऊ शकते. याच बरोबोर कंपनी टाटा अविन्या नावाने इलेक्ट्रिक कारही सादर करेल.
2 / 11
माध्यमांतील वत्तांनुसार, या कन्सेप्ट मॉडेलवर आधारित वाहने 2024 पर्यंत लोन्च केली जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, टाटाने ही मॉडेल्स 'न्यू डिजिटल डिझाइन लँग्वेज'वर तयार केलेली आहेत. तर जाणून घेऊयात टाटाच्या या दोन्ही कन्सेप्ट मॉडल्ससंदर्भात...
3 / 11
Tata Curvv - Curvv या नावावरूनच समजते की, कंपनी या कर्व्ही डिझाईन देत आहे. तसेच हिला स्लोपी रूफ देण्यात आला आहे. जो मागील बाजूस कूप स्टाईलमध्ये पुढील बाजूस जातो. या कारमध्ये शार्प स्टायलिंग, थ्री लेअर असलेले डॅशबोर्ड, मल्टीपल स्क्रीन आणि अँग्युलर डिझाईन देण्यात आले आहे.
4 / 11
कर्व्ह कॉन्सेप्टमध्ये मॉडेलसाठी नव्या जनरेशन 2 ईव्ही आर्किटेक्चरचा समावेश करण्यात येईल, असे टाटाने म्हटले होते. यात, अनेक बॉडी स्टाईल आणि पॉवरट्रेन पर्याय एकाच वेळी आणले जातील. Gen-2 आर्किटेक्चर Gen-1 चे मोडिफाईड रूप आहे. हे मॉडिफिकेशन मोठी बॅटरी आणि विविध पॉवरट्रेन पर्याय, जसे की ऑल व्हील ड्राईव्ह आदी कारमध्ये सहजपणे फीट होऊ शकतात.
5 / 11
टाटाने कर्व्हच्या पॉवरट्रेनसंदर्भात अद्याप कसलाही खुलासा केलेला नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, ही कार कंपनीच्या दुसऱ्या पिढीतील EV आर्किटेक्चरवर आधारित असून सिंगल चार्जवर 500 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.
6 / 11
या कारच्या केबीनला फ्यूचरिस्टिक इंटीरिअर लेआउट देण्यात आले आहे. यामुळे कारला एक वेगळाच लूक मिळतो. या कारमध्ये रिअर व्ह्यू मिररच्या जागी कॅमेरा देण्यात येईल. जो आतापर्यंत टाटाच्या कुठल्याही वाहनात देण्यात आलेला नाही, हे या कारचे विशेष वैशिष्ट आहे.
7 / 11
हीच्या केबिनमध्ये सेंटर स्टेजवर एका मोठ्या टचस्क्रीनसह एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरही देण्यात येईल. जे पारंपरिक इंस्ट्रूमेंट क्लस्टरच्या तुलनेत वेगळे आहे. तसेच या कारमध्ये अँम्बिएंट लायटिंग, टचस्क्रीन कंट्रोलसह ऑटोमॅटिक एअर कंडिशन (AC) सारखे अनेक अॅडव्हॉन्स फीचर्स देखील बघायला मिळू शकतात.
8 / 11
Tata Avinya - स्टायलिश अविन्य कॉन्सेप्ट देखील गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आले होते. सध्या, टाटाने आपले संपूर्म लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर केंद्रित केले आहे. याशिवाय, अविन्या कसेप्टमध्ये Gen-3 आर्किटेक्चरचा वापर केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, हे Gen 2 पेक्षाही अधिक मॉडिफाईड आर्किटेक्चर मानले जाते.
9 / 11
Avinya मॉडेलची स्टायलिंग बॅरी इलेक्ट्रिक मोटर्सवर आधारलेली आहे. या कांसेप्टच्या वाहनांमध्ये फारच छोटे फ्रंट आणि रिअर ओव्हरहँग्स आहे. हे केवळ लांब व्हीलबेस वाढविण्यास मदत करतात. याच बरोबर कारला चांगले ग्रिल सेक्शन, स्लिम हेडलाइट आणि स्मार्ट स्टाईल फ्रंट स्प्लिटरसह 'टी' लोगो मिळेल. या कारला फ्लोटिंग टेल-लाईट लुकही दिसेल.
10 / 11
कंपनी क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक वाहन म्हणून ही कार सादर करू शकते. ही Gen3 ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल. माध्यमांतील वृत्तांनुसार कंपनी या कारमध्ये अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सेटअप देईल, यामुळे ही कार केवळ 30 मिनिटांतच एवढी चार्ज होईल की 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल.
11 / 11
Avinya ईव्हीमध्ये कंपनी कनेक्टेड कार तंत्रज्ञानासोबतच अॅडव्हॉन्स ड्रायव्हर अॅसिस्टन्स सिस्टिम (ADAS) टेक्नॉलॉजीही दिली जाऊ शकते. याशिवाय या कारमध्ये व्हॉईस कमांड सिस्टिमही दिली जाऊ शकते.
टॅग्स :Tataटाटाauto expoऑटो एक्स्पो 2020Automobileवाहनcarकार