शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 10:55 AM

1 / 7
टाटा मोटर्स यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रीक कारचा धमाका करणार आहे. इलेक्ट्रीक कारची संख्या वाढविण्यासोबतच त्यांचा चार्जिंग स्पीड आणि रेंजही वाढविणार आहे. पुढील आठवड्याच दिल्लीत ऑटो एक्स्पो होत आहे. या एक्स्पोमध्ये टाटा पंच इलेक्ट्रीकपासून काही कॉन्सेप्ट कार दाखविणार आहे.
2 / 7
टाटा या ऑटो एक्स्पोमध्ये दोन नवीन कॉन्सेप्ट कार Curvv आणि Avinya दाखविणार आहे. कर्व ही फ्युटर मिड साईज एसयुव्ही असेल, जी आयसीई आणि इलेक्ट्रीक अशा दोन्ही पावरट्रेनसोबत लाँच केली जाईल. तर अविन्या ही कार इलेक्ट्रीक कार असेल.
3 / 7
कॉन्सेप्ट मॉडेलवरील या कार २०२४ पर्यंत लाँच केल्या जाऊ शकतात. या कार टाटाच्या नव्या डिजिटल डिझाईन लँग्वेजवर तयार केल्या आहेत. कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये काही कारबाबतची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊयात...
4 / 7
नावाप्रमाणेच, Curvv ला कंपनीकडून कर्व्ही डिझाइन दिले जात आहे. ज्यामध्ये मागील बाजूस कूप शैलीच्या दिशेने एक उतार असलेले छप्पर आहे. यात शार्प स्टाइल, थ्री-लेयर डॅशबोर्ड, मल्टिपल स्क्रीन आणि अँगुलर डिझाइन आहे.
5 / 7
नवीन जनरेशन 2 EV आर्किटेक्चरचा वापर कर्व संकल्पनेवरील मॉडेलमध्ये केला जाईल असे टाटा म्हणाली होती. Gen 2 आर्किटेक्चर ही Gen 1 ची सुधारित आवृत्ती आहे. या बदलामुळे मोठी बॅटरी आणि विविध पॉवरट्रेन पर्याय जसे की ऑल व्हील ड्राईव्ह देता येऊ शकतात. एका चार्जमध्ये 500 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते. रियर व्ह्यू मिररच्या जागी कॅमेरा दिला जाईल
6 / 7
स्टायलिश अविन्या ही कॉन्सेप्ट कार गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. Avinya संकल्पनेत Gen 3 आर्किटेक्चरचा वापर केला जाऊ शकतो. बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर्ससोबत ग्रिल विभागात 'T' लोगो, स्लिम हेडलाइट्स आणि स्मार्टली स्टाइल केलेले फ्रंट स्प्लिटर असेल. हे एक क्रॉसओवर इलेक्ट्रिक वाहन असू शकते.
7 / 7
कंपनी अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सेटअप प्रदान करेल, ज्यामुळे ही कार फक्त 30 मिनिटांत 500 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याएवढी चार्ज होईल. यात अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) देखील मिळण्याची शक्यता आहे.
टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरTataटाटा