शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti suzuki : फक्त दोन दिवसांचा वेळ! सप्टेंबरपासून मारुतीच्या सर्व गाड्या पुन्हा महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 1:37 PM

1 / 7
मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) सर्व गाड्यांच्या किंमती सप्टेंबरपासून पुन्हा एकदा वाढणार आहेत. आपण मारुतीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि वाढलेल्या किंमतींपासून आपल्याला वाचायचे असेल, तर आपल्याकडे केवळ ३१ ऑगस्ट म्हणजेच उद्यापर्यंतचाच वेळ आहे. आपण 31 ऑगस्टपर्यंत सध्याच्या किंमतीतच मारुती कार खरेदी करू शकता.
2 / 7
खर्च वाढल्याने किम्मत वाढवली - खरे तर, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने 30 ऑगस्टला सांगितले, की वाढत्या खर्चामुळे कंपनीने सप्टेंबरपासून पुन्हा एकदा वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या एक वर्षात गाडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
3 / 7
यावेळी सर्वच वाहनांच्या किंमतीत वाढ - मारुती सुझुकीने सप्टेंबर -2021 मध्ये सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढील महिन्यात मारुती सुझुकीच्या सर्वच गाड्या वाढलेल्या किंमतीत मिळतील. यावर्षभरात तब्बल चार वेळा मारुती सुझुकीच्या कारच्या किंमती वाढल्या आहेत.
4 / 7
यापूर्वी जुलैमध्ये वाढल्या होत्या कारच्या किंमती - यापूर्वी कंपनीने जुलै महिन्यात स्विफ्ट आणि इतर मॉडेल्सच्या सीएनजी व्हेरिएंटच्या किंमतीत 15,000 रुपयांपर्यंतची वाढ केली होती. तेव्हाही कंपनीने कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे गाड्यांच्या किंमती वाढल्या म्हटले होते.
5 / 7
एप्रिलमध्येही झाली होती वाढ - मारुती सुझुकीने सेलेरियो आणि स्विफ्ट वगळता एप्रिल 2021 मध्येही आपल्या बहुतेक मॉडेल्सच्या किमती 22,500 रुपयांपर्यंत वाढविल्या होत्या. एप्रिलपूर्वी कंपनीने जानेवारीमध्येही कारच्या किंमती वाढविल्या होत्या.
6 / 7
मारुती वॅगनआर बेस्ट सेलिंग कार - भारतीय बाजारात मारुती सुझुकीची जबरदस्त पकड आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप -10 कारच्या यादीत 8 कार एकट्या मारुतीच्या होत्या. तर ह्युंदाईची एकमेव क्रेटा टॉप -10 मध्ये स्थान मिळवू शकली.
7 / 7
मारुती कारची जबरदस्त मागणी - जुलैमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. जुलै महिन्यात मारुती वॅगनआरच्या एकूण 22,836 युनिट्सची विक्री झाली. WagonR नंतर जुलैमध्ये मारुती स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली. याशिवाय ब्रेझा, अल्टो, एस-प्रेसो, इको आणि एर्टिगालाही प्रचंड मागणी आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन