शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑटोमॅटीक कार फायद्याची की तोट्याची? फक्त पाय सांभाळा..., लोकांची मागणी का वाढू लागलीय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 3:19 PM

1 / 8
ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल होत आहेत. महागड्या इंधनावरील कारवरून लोक इलेक्ट्रीकमध्ये स्विच होत आहेत. तसेच भाराभर बटनांच्या कार आता आधुनिक डिस्प्लेंमुळे चकाचक वाटू लागल्या आहेत. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. नुसता लुक आणि फिलच नाही तर इंजिनापासून ते गिअरबॉक्सपर्यंत सारे बदलू लागले आहे. गिअर बॉक्सपेक्षा लोक आता ऑटोमॅटीक कार पसंद करू लागले आहेत.
2 / 8
या ऑटोमॅटीक कारची मागणी एवढी का वाढत चाललीय? कंपन्यांच्या दाव्यानुसार जरी मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक गिअरब़ॉक्सच्या कारचे मायलेज फारसा फरक नसलेले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांचा अनुभव वेगळा आहे. परंतू, वाहतूक कोंडीत किंवा चढणीच्या रस्त्यावर त्रासाचा अनुभवही वेगळा आहे. तुमच्याही मनात द्विधा मनस्थिती असेल तर मग चला पाहुया ऑटोमॅटीक कारचे फायदे तोटे...
3 / 8
मॅन्युअल कारचा सर्वाधिक त्रास हा वाहतूक कोंडीमध्ये होतो. साधारण सात-आठ वर्षांपूर्वी रस्त्यांवर एवढ्या गाड्या नव्हत्या. परंतू, आता कार कंपन्यांचा महिन्याचा विक्रीचा एकत्रित आकडा पाहिला तर दर महिन्याला तीन लाखांहून अधिक कार विकल्या जात आहेत. अशा वाहतूक कोंडीमध्ये ऑटोमॅटीक कारच कमी त्रासदायक ठरत आहे.
4 / 8
ऑटोमॅटीक कारमध्ये सारखा क्लच दाबण्याची गरज राहत नाही. शिवाय कार आपोआपच गिअर शिफ्ट करत असते. यामुळे ती शहरातील ट्रॅफिकमध्ये चालविण्यास सोपी जाते. दोन्ही प्रकारच्या कारमध्ये शहरात मायलेजमध्ये फारसे अंतर नाहीय. परंतू, गिअर निवडण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी ऑटोमॅटीक कारमध्ये तितकासा वापरता येत नाही.
5 / 8
स्टॉप आणि गो ट्रॅफिकसाठी उत्तम पर्याय. ड्रायव्हिंग शिकणाऱ्यांसाठी सर्वोत्तम. झटके बसत नाहीत. चांगली रिसेल व्हॅल्यू
6 / 8
मॅन्युअल कारच्या तुलनेत महाग पडतात. जास्तीचा देखभाल खर्च आणि अगदी थोडं पण कमी मायलेज.
7 / 8
ऑटोमॅटिक कार चालवताना, कार पूर्णपणे थांबेपर्यंत गिअर लिव्हर न्यूट्रलवर ठेवू नका. ऑटोमॅटिक कारमध्ये क्लच नसतात, त्यामुळे तुमचा डावा पाय मोकळा ठेवा. तर नेहमीप्रमाणे उजवा पाय वापरा. ऑटोमॅटिक कार पार्क करताना, गीअर लीव्हर पी मोडवर न्या आणि हँड ब्रेक लावा.
8 / 8
ऑटोमॅटिक कार ड्रायव्हिंगच्या दृष्टीने सोप्या आहेत. नवीन चालविणारा किंवा महिलांसाठी या कार खूप चांगल्या आहेत. चढणीला पिकअपसाठी मॅन्युअल कारना झगडावे लागते. बरेचदा ड्रायव्हर फेल होतात. तो प्रसंग ऑटोमॅटीक कारमध्ये क्वचितच घडतो. यामुळे चढणीच्या रस्त्यांना ट्रॅफिक लागले तर चालकाला आत्मविश्वास येतो.
टॅग्स :carकार