Avoid these mistakes while driving a car ... small but big things to look at!
कार चालविताना या चुका टाळा...दिसायला छोट्या पण मोठ्या गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:28 PM1 / 5कार चालविताना अपघात टाळण्यासाठी नियम पाळण्याबरोबरच अन्य काही अशा गोष्टी असतात त्यांची काळजी न घेतल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. या गोष्टी अत्यंत छोट्या असतात. मात्र, लोक याकडे लक्ष देत नाहीत. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपत्कालीन स्थितीत ब्रेक दाबताना, गिअर टाकताना समस्या निर्माण होऊ शकते. 2 / 5पाण्याची किंवा थंड पेयाची बाटलीसारखी घरंगळणारी वस्तू कधीही बेपर्वाईने कारमध्ये ठेऊ नये. कारण अचानक ब्रेक- क्लच दाबताना ही बॉटल चालकाच्या सीटखालून पुढे येऊन पॅडलखाली अडकल्याने अपघात घडलेले आहेत. यामुळे अशा गाडीमध्ये बॉटल होल्डर दिलेले असतात तेथेच या बॉटल ठेवाव्यात. 3 / 5चप्पलाची धूळ, कचऱ्यामुळे गाडी खराब होऊ नये म्हणून फ्लोअर मॅट वापरले जाते. मात्र, चालकाकडील बाजुचे फ्लोअरमॅट अचानक दुमडून पुढे ब्रेक, क्लच पॅडलमध्ये आल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. यामुळे चालकाकडील फ्लोअरमॅट नेहमी फिटिंग असणारे असावे. 4 / 5चप्पलाची धूळ, कचऱ्यामुळे गाडी खराब होऊ नये म्हणून फ्लोअर मॅट वापरले जाते. मात्र, चालकाकडील बाजुचे फ्लोअरमॅट अचानक दुमडून पुढे ब्रेक, क्लच पॅडलमध्ये आल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. यामुळे चालकाकडील फ्लोअरमॅट नेहमी फिटिंग असणारे असावे. 5 / 5पायात चप्पल घालून बऱ्याचदा कार चालविली जाते. ही सवयही धोक्यात घालू शकते. चप्पल पायातून घसरण्याची शक्यता असते. शिवाय चप्पल ब्रेक, क्लच आणि अॅक्सिलेटरला अडकून अपघात होऊ शकतो. यामुळे कार चालविताना नेहमी पायाला फिट बसणारे सँडल, शूज वापरावेत. चप्पल असेल तर ती सीटखाली ठेवून कार चालवावी. आणखी वाचा Subscribe to Notifications