शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Motors 5 Million Club : जबरदस्त! TATA ची कमाल, आता टाटा मोटर्स ५-मिलियन क्‍लबमध्‍ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 6:20 PM

1 / 7
गेल्या काही वर्षांपासून प्रवासी वाहन कार विभागात झपाट्याने वाढ करणाऱ्या टाटा मोटर्सच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, कंपनीनं ५ मिलियन म्हणजेच ५० लाख युनिट्सच्या उत्पादनाचा आकडा पार केला आहे.
2 / 7
विशेष बाब म्हणजे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या १८३ व्या जयंतीदिनी कंपनीच्या नावावर हे यश आलं आहे. कंपनीचं हे यश दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्स आणि एसयुव्हीच्या न्यू फॉरएव्हर रेंजचा वापर करत ५० लाख चिन्हांकित केलं.
3 / 7
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रीक मोबिलिटी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, प्रत्येक मिलियनपासून पुढील मिलियनपर्यंतचा प्रवास चढ-उताराचा होता. आम्ही प्रत्येक नव्या प्रोडक्टसह भारताला बदलण्याचा प्रयत्न केला.
4 / 7
टाटा मोटर्सनं त्यांचं पहिले व्यावसायिक वाहन १९७७ मध्ये पुण्यातील प्लांटमधून रोलआऊट केलं. त्याच वेळी, पहिले प्रवासी वाहन १९९८ मध्ये टाटा इंडिका म्हणून आणलं गेलं. Tata Indica ला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
5 / 7
आत्तापर्यंत कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल बाजारात आणत आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा सफारी, टाटा सुमो, टाटा इंडिगो, टाटा हॅरियर, टाटा पंच, टाटा नेक्सॉन, टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा नॅनो, टाटा अल्ट्रोझ यासारख्या अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये कंपनीचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे.
6 / 7
टाटा मोटर्सच्या नावावर एक विलक्षण कामगिरी नोंदवण्यात आली आहे. खरं तर, कंपनीची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रीक कार असलेल्या Tata Nexon EV ने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करण्याचा नवा विक्रम केला आहे. हा प्रवास त्याने अवघ्या ४ दिवसांत केला आहे.
7 / 7
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेक्सॉनने काश्मीर ते कन्याकुमारी हे ४००३ किलोमीटरचे अंतर ९५ तास ४६ मिनिटांत कापले. या मोठ्या प्रवासासह या इलेक्ट्रीक एसयूव्हीचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं गेलं आहे. यापूर्वी, नेक्सॉन ईव्हीने लडाखमधील उमलिंग ला पासवर यशस्वी चढाई केली होती. हा जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड होता. ज्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची १९,०२४ फूट आहे.
टॅग्स :Tataटाटाcarकार