शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bajaj CT 125X: बजाजने लॉन्च केली सर्वात स्वस्त 125CC बाईक; होंडा शाईनला थेट टक्कर; पहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 8:44 PM

1 / 8
Bajaj CT 125X : भारतीय दुचाकी निर्माता Bajaj Auto ने ग्राहकांसाठी एक नवीन आणि अर्फोडेबल 125CC बाईक Bajaj CT 125X लॉन्च केली आहे. या बाईकचे मॉडेल दिसायला कंपनीच्या CT110X सारखेच आहे.
2 / 8
बजाजने आपल्या या नव्याकोऱ्या बाईकला तीन डुअल-टोन पँट मॉडेल्ससह बाजारात आणले आहे. एक मॉडेल तुम्हाला ब्लू आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन, दुसरे मॉडेल रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आणि तिसरे मॉडेल ग्रीन आणि ब्लॅक कॉम्बिनेशनसह मिळेल. चला तर मग जाणून घेऊन या गाडीची किंमत आणि इतर फिचर्स...
3 / 8
कंपनीने आपल्या या नवीन CT 125X Ex Showroom Price 71,354 रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) पक्की केली आहे. या किमतीत ही गाडी बाजारात उपलब्ध असलेल्या लोकप्रिय Honda Shine , Hero Super Splendor आणि TVS Radeon सारख्या गाड्यांना टक्कर देईल.
4 / 8
या बाईकचे डिझाईन CT110X प्रमाणेच आहे. या CT125X ल हॅलोजन बल्ब आणि गोल हेडलँप देण्यात आला आहे. यासोबतच एक लहानसा काउलदेखील आहे, जो एलईडी डेटाइम रनिंग लँप स्ट्रिपसह हेडलँपला कव्हर करतो. बाईकच्या साइडमध्ये फ्यूल टँकवर तुम्हाला कंपनीची ब्रँडिंग आणि ग्राफिक्स मिळेल.
5 / 8
बाईकच्या रिअरमध्ये ग्रॅब रेल मिळेल, जी वजनदार सामान ठेवण्यासाठी उपयोगात आणता येईल. या गाडीची सीटिंग कॅपेसिटी खूप चांगली करण्यात आली आहे. तसेच, याच्या सीटमध्ये टीएम फोमचा वापर करण्यात आला आहे. याचे सिंगल पीस सीट लांब असून, यावर रायडर आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला आरामात बसता येईल.
6 / 8
कंपनीने बाइकच्या बॉडीवर्कवर ज्यास्त काम केले नाही, पण ही गाडी सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. कंपनीने यात रफ रोड्स आणि मोठ्या स्पीड ब्रेकर्सपासून इंजिनचे संरक्षण करण्यासाठी बेली पॅनदेखील ऑफर करत आहे. या बाईकला ट्यूबलेस टायर्स, एलॉय व्हील्स आणि फोर्क गेटर्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
7 / 8
या बाईकचे फ्रंट टायर 80/100 आणि रिअर टायर 100/90 चे असून, दोन्ही टायर 17 इंच साइजसह येतात. या बाईकमध्ये 124.4 सीसी 4 स्ट्रोक इंजिन दिले आहे.
8 / 8
कंपनीने यात आपल्या डीटीएस-आय टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. इंजिनच्या क्षमतेबाबत बोलायचे झाले, तर इंजिन 8000 आरपीएमवर 10.9 पीएसची पॉवर आणि 5500 आरपीएमवर 11nm पीक टॉर्क आउटपुट देण्यास सक्षम आहे.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलAutomobileवाहन